-
Cannes 2024: ‘कान फिल्म फेस्टिव्हल’चे रेड कार्पेट यंदा खूप चर्चेत राहिले.
-
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व एन्फ्युएन्सर्सचा जलवा यंदाच्या रेड कार्पेटवर पाहायला मिळाला.
-
यासोबत ऐश्वर्या राय, सोभिता धुलीपाला, कियारा अडवाणी या आघाडीच्या अभिनेत्रींनी कानमध्ये जलवा दाखवला.
-
यातच एका तरुणीने व तिच्या मराठमोळ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
cannes मध्ये हिरवी पैठणी, नाकात नथ व चंद्रकोर लावलेली ती तरुणी कोण? अशी चर्चा तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर होत आहे.
-
Cannes च्या रेड कार्पेटवर आपल्या अस्सल मराठी लूकने लक्ष वेधून घेणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव निहारिका रायजादा आहे.
-
रेड कार्पेटवर ती काठांची हिरवी पैठणी नेसून पोहोचली. त्याबरोबर तिने लाल शेला घेतला होता.
-
साधा मेकअप अन् मोजकेच दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला.
-
हील्सवर नऊवारी पैठणी नेसून पोहोचलेली ही अभिनेत्री आजवर बॉलीवूड चित्रपटांमध्येही झळकली आहे.
-
निहारिकाने सूर्यवंशी, टोटल धमाल, आयबी ७१, वॉरियर सावित्री अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
निहारिका ही हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार ओपी नय्यर यांची नात आहे.
-
निहारिका आपल्या अभिनयासोबतच फॅशनसाठी ओळखली जाते.
-
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
-
ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळेही चर्चेत असते.
-
(सर्व फोटो – निहारिका रायजादा इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही