-
शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अॅण्ड मिसेस माही’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटामध्ये राजकुमार रावने पती (महेंद्र ) तर जान्हवी कपूरने पत्नी (महिमाची) भूमिका साकारली आहे. या चित्रपटात महेंद्र आपल्या पत्नीला क्रिकेटर बनण्यासाठी प्रशिक्षण देतो आणि तिची इच्छा पूर्ण करतो अशी कथा आहे. यानिमित्ताने भारतीय महिला खेळाडूंच्या कथांचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
-
अमोल गुप्ते दिग्दर्शित ‘सायना’ या चित्रपटामध्ये परिणीती चोप्राने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स बायोपिक आहे.
-
स्पोर्ट्स बायोपिक ‘दंगल’मध्ये फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी अनुक्रमे गीता आणि बबिता फोगटची भूमिका साकारली आहे. तर आमिर खानने गीता आणि बबिताचे वडील महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली आहे.
-
तापसी पन्नूने ‘शाबाश मिथू’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे, जी भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांच्या जीवनावर आधारित आहे.
-
अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’या चित्रपटामध्ये कंगना राणौतने माजी कबड्डी विश्वविजेत्याची भूमिका साकारली आहे, जी या खेळात परतण्याचा निर्णय घेते.
-
ओमंग कुमार दिग्दर्शित ‘मेरी कोम’ या बायोपिकमध्ये प्रियांका चोप्राने भारताची बॉक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोमची मुख्य भूमिका साकारली आहे.
-
आर बाल्कीचा ‘घूमर’ एका महत्वाकांक्षी क्रिकेटरची प्रेरणादायी कथा सांगणारा चित्रपट आहे. या क्रिकेटपटूचा उजवा हात अपघातात गमावतो. या चित्रपटात एक गोलंदाज म्हणून तिचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सैयामी खेरने यात प्रमुख भूमिका साकारली आहे.
-
गुरिंदर चढ्ढा यांच्या ‘बेंड इट लाइक बेकहॅम’ या चित्रपटामध्ये एका भारतीय पंजाबी शीख मुलीची कथा आहे जी फुटबॉल चॅम्पियन बनण्याची आकांक्षा बाळगते. (All Photo- Social Media/Wikipedia)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”