-
सध्या अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अनंत आणि राधिका १२ जुलै २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
राधिका-अनंतच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहेत. लग्नाचे कार्यक्रम ३ दिवस चालणार आहेत.
-
लग्नाच्या दिवसाबद्दल म्हणजे १२ जुलैबद्दल बोलायचं झाल्यास त्यादिवशी शुक्रवार आहे. लग्नासाठी शुक्रवार हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
-
ज्योतिषांच्या मते १२ जुलै हा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी काही शुभ संयोग घडत आहेत जे लग्नासाठी अत्यंत शुभ मानले जातात.
-
ज्योतिष शास्त्रानुसार १२ जुलै रोजी दुपारी १२.३२ वाजल्यापासून सप्तमी तिथी सुरू होईल जी लग्नासाठी खूप शुभ असेल.
-
या दिवशी रवि योग आणि हस्त नक्षत्रही आहेत. या योग आणि नक्षत्रात केलेली सर्व कामे अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरतात, असं मानलं जातं.
-
या दिवशी सर्व ग्रहही आपल्या शुभ स्थितीत असतील. त्यामुळे या दिवशी लग्न झाल्यास जीवनात सुख-समृद्धी येईल.
-
अनंत आणि राधिकाचे लग्न मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
(फोटो स्त्रोत: @radhikamerchant_/instagram)
-
सध्या या दोघांचे दुसरे प्री-वेडिंग इटलीमध्ये होत आहे.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल