-
अभिनतरी समृद्धी केळकरने ‘फुलला सुगंध मातीचा’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केले.
-
यानंतर समृद्धी ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स शोचे सूत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमात ती वेगवेगळ्या थीमनुसार पेहराव करताना दिसते.
-
नुकतंच या कार्यक्रमात शालेय जीवनावर आधारित थीम ठेवण्यात आली होती.
-
यासंबंधीचे फोटो समृद्धीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी समृद्धीने ‘वर्ग प्रतिनिधी’ असा बिल्ला घातला आहे.
-
तिने वैभव आणि फुलवासह क्यूट फोटो काढले आहेत.
-
यावेळी वैभव शारीरिक शिक्षणाचे गुरुजींप्रमाणे भासत आहे.
-
तर फुलवा खामकरने शाळेच्या प्राध्यापिकांचा लूक केला होता.
-
दरम्यान, समृद्धीने शेअर केलेल्या फोटोवर ‘माझे के-ड्रामा व्हर्जन’ असे कॅप्शन लिहिले आहे.
-
समृद्धी या लूकमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.
-
तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांनी फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच