-
‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्ये सहभागी झालेली मराठमोळी अभिनेत्री छाया कदम सध्या चर्चेत आहे.
-
‘कान फिल्म फेस्टिव्हल’साठी छायाने आईची पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती.
-
काही दिवसांपूर्वी छायाचा ‘लापता लेडीज’ आणि ‘मडगाव एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटांमधील छायाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
-
नुकतेच छायाने अभिनेता, दिग्दर्शक रवी जाधवच्या घरी स्नेहसंमेलनसाठी हजेरी लावली.
-
रवी जाधवच्या घरातील काही फोटो छायाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना छायाने “प्रेम – माया – जिव्हाळा आणि Reunion” असे कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोमध्ये छायाबरोबर रवी जाधवची पत्नी मेघना जाधव आहे.
-
छायाच्या या फोटोंवर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने “Gooaaaddwaaa” अशी कमेंट केली आहे.
-
रवी जाधवच्या ‘न्यूड’ चित्रपटात छायाने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : छाया कदम / इन्स्टाग्राम)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे