-
बॉलीवूडमधील सर्वात चर्चेतील जोडप्यापैकी एक म्हणजे अमिताभ व जया बच्चन होय.
-
या जोडप्याच्या लग्नाला आता ५१ वर्षे झाली आहेत.
-
३ जून १९७३ रोजी जया बच्चन आणि अमिताभ बच्चन विवाहबंधनात अडकले होते.
-
या जोडप्याच्या संसाराला तीन दिवसांपूर्वी ५१ वर्षे पूर्ण झाली.
-
यानिमित्ताने जया बच्चन व अमिताभ यांच्या लग्नातील काही खास फोटोंवर एक नजर टाकुयात.
-
अमिताभ बच्चन यांच्या लग्नात खूप कमी पाहुणे आले होते.
-
अमिताभ बच्चन यांच्या वरातीत फक्त पाच पाहुणे होते.
-
बिग बी यांचे जवळचे मित्र जगदीश राजन आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना लग्नाचे निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, कामात व्यग्र असल्यामुळे इंदिरा गांधी अमिताभ बच्चन यांच्या लग्नात आल्या नाही.
-
अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला उपस्थित असलेल्या पाच जणांमध्ये संजय गांधी, जवळचे मित्र जगदीश राजन आणि एका प्रसिद्ध लेखकाचा समावेश होता.
-
या लग्नात संजय गांधी यांनी त्यांच्या काही मित्रांनाही आमंत्रित केले होते.
-
अमिताभ बच्चन यांच्या घरातून वरात घेऊन एकूण तीन गाड्या निघाल्या, ज्यामध्ये एका कारमध्ये संजय गांधी आणि त्यांचे मित्र, दुसऱ्या कारमध्ये जगदीश राजन आणि त्यांचे कुटुंबीय आणि तिसऱ्या कारमध्ये अमिताभ बच्चन होते.
-
अमिताभ व जया यांच्या लग्नाबद्दल कुणालाच कळू नये म्हणून कोणालाही लग्नाला बोलावण्यात आलं नव्हतं.
-
बिग बींचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या मुलाच्या लग्नाची बातमी त्यांच्या परिसरात पसरू नये याची पूर्ण काळजी घेतली होती.
-
पण जेव्हा शेजाऱ्यांनी घरात सजावट व लाइट पाहिल्या आणि त्याबद्दल विचारलं तेव्हा अमिताभ यांचे कुटुंबीय खोटं बोलले होते.
-
घरी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे, असं अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होत.
-
अमिताभ बच्चन व जया बच्चन दोघेही या इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस व श्वेता बच्चन इन्स्टाग्राम
‘या’ तीन राशींना शनी-शुक्र देणार नुसता पैसा; ३० वर्षानंतर मीन राशीतील ग्रहांची युती भाग्य चमकवणार