-
भारतीय सिनेसृष्टीत अत्यंत अदबीनं घेतलं जाणारं नाव म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरादार त्यांनी मराठीसह बॉलीवूड गाजवलं. आजही त्यांचे चित्रपट, गाणी तितक्याच आवडीनं पाहिली जातात. अशा या हरहुन्नरी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा ‘जैत रे जैत’ चित्रपटातील हुबेहूब लूक एका मराठी अभिनेत्रीने केला होता.
-
स्मिता पाटील यांच्यासारखा हुबेहूब लूक करणारी ही अभिनेत्री आहे नंदिता पाटकर.
-
काही दिवसांपूर्वी नंदिता पाटकरने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर स्मिता पाटील यांच्या लूकमधील फोटो शेअर केले होते.
-
नंदिता पाटकरचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून खूपच चर्चेत आले आहेत.
-
नंदिताला या साडी, चोळीतील लूकमध्ये पाहून अनेकांना तिच्यात स्मिता पाटील यांचा भास झाला.
-
नंदिताने स्मिता पाटील यांच्यासारख्या केलेल्या लूकचं कौतुक मराठी कलाकारांसह चाहत्यांनी केलं आहे. “अगदी निरखून बघितल्यावर नंदिता दिसली, पण पहिल्या लूकमध्ये स्मिता पाटील दिसली”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
-
तसंच “लय भारी”, “कमाल”, “सुंदर”, “फोटो पाहून स्मिता पाटील यांचा भास झाला”, “अचानक स्मिता पाटीलच दिसल्या”, अशा अनेक प्रतिक्रिया नंदिताच्या फोटोंवर उमटल्या आहेत.
-
नंदिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिचं ‘व्हय आय एम सावित्रीबाई फुले’ हे नाटक रंगभूमीवर सुरू आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – नंदिता पाटकर इन्स्टाग्राम आणि ईगल मराठी मुव्ही युट्यूब चॅनेल

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण