-
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये काल अटीतटीचा सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा ६ धावांनी पराभव केला.
-
पाकिस्तानाच्या संघावर पुन्हा एकदा भारताने विजय मिळवल्याने सामान्य लोकांसह बॉलीवूड कलाकारांचादेखील आनंद द्विगुणित झाला.
-
नुकताच बाबा झालेल्या वरुण धवनने इन्स्टाग्रामवर कालच्या सामन्याचे काही क्षण शेअर करत त्याला कॅप्शन दिलं, “जादुई क्षण… काय सामना रंगला आहे. भारत चमकलाय बुमराह. जय हिंद”
-
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ लवकरच भेटीला येणार आहे. कार्तिकनेदेखील त्याच्या सोशल मीडियावर भारत-पाकिस्तानच्या सामन्याबद्दल लिहिलं, “चॅम्पियन बनणार भारत संघ, आपण सामना अगदी उत्तम प्रकारे जिंकलो आहोत.”
-
बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर याबद्दल पोस्ट शेअर केली. “अरे बाप रे बाप ! भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना मी बघत होतो आणि मी मध्येच टीव्ही बंद केला कारण असं वाटत होतं की आपण आता हरतोय. पण आता अचानक इंटरनेट बघितलं आणि आपण जिंकलो.”
-
बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रानेदेखील या विजयासाठी एक खास पोस्ट शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिलं, “खूप उत्तमरित्या जिंकलो आहोत आपण. सुंदर रविवार गेला आजचा. खूप जास्त उत्सुकता होती.”
-
अभिनेत्री श्रद्धा कपूरने सेल्फी शेअर करत त्यावर टीम इंडिया असा स्टिकर लावत इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. याला कॅप्शन देत तिने लिहिलं, “मला एवढा आनंद होतोय जस की २-३ विकेट तर मीच घेतली आहेत.”
-
प्रीती झिंटानेदेखील तिच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. “व्वा काय सामना झाला. खूप छान पुनरागमन केलं. ११९ धावांचा गड राखून ठेवलेल्या भारताच्या क्रिकेट संघाला पूर्ण गुण. बॉलिंग युनिटचा विशेष उल्लेख आणि जसप्रीत बुमराहच्या अविश्वसनीय कामगिरीसाठी सलाम. मज्जाच आली.
-
‘धडक’ फेम आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरनेदेखील त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आणि लिहिलं, “टीम इंडियाने काय उत्तम कामगिरी केली आहे.” (All Photos- Social Media)
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर