-
वरुण धवन नुकतीच गोंडस मुलीचा बाबा झाला आहे. मुलीच्या जन्मानंतर वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. (@ varundvn /Insta)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन नवीन घरात शिफ्ट होत आहे जेणेकरून त्याच्या मुलीला खेळण्यासाठी नर्सरी किंवा प्लेरूमसारख्या सुविधा मिळू शकतील. (@ varundvn /Insta)
-
पण, वरुण धवन ज्या नवीन घरात राहायला जाणार आहेत, ते बॉलीवूड सुपरस्टारचं घर आहे, जो कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे. (@ varundvn /Insta)
-
खरं तर, तो दुसरा कोणी नसून हृतिक रोशन आहे, ज्याचं जुहूचं घर वरुण धवननं भाड्यानं घेतलं आहे. (@ऋतिक रोशन/FB)
-
सध्या हृतिक रोशन या अपार्टमेंटमध्ये राहत असून तो लवकरच जुहू येथील दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. (@ऋतिक रोशन/FB)
-
वरुण धवन हृतिक रोशनच्या घरी राहायला आल्यास तो अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांचा शेजारी होईल. (@ varundvn /Insta)
-
वरुण धवन सध्या त्याच्या स्वतःच्या 4 BHK फ्लॅटमध्ये राहतो जो त्याने २०१७ मध्ये सुमारे २० कोटी रुपयांना विकत घेतला होता. (@ varundvn /Insta)
-
हृतिक रोशनच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती ३१३० कोटी रुपये आहे. (@ऋतिक रोशन/FB)
-
वरुण धवनने हृतिक रोशनचे जुहूचे जे घर भाड्याने घेतले आहे त्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये आहे. (@ऋतिक रोशन/FB)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”