-
‘हीरामंडी’ फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
-
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा लवकरच तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालसोबत मुंबईत लग्न करणार आहे.
-
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की २३ जून रोजी मुंबईत दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
दरम्यान, आज आपण झहीर इक्बाल आणि त्याच्या लक्झरी जीवनशैलीविषयी जाणून घेणार आहोत.
-
१० डिसेंबर १९८८ रोजी मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीच्या कुटुंबात झहीर इक्बालचा जन्म झाला. मुंबईतच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.
-
झहीरचे वडील इक्बाल रतनसी हेही ज्वेलर्स आहेत. इतकंच नाही तर त्यांची सलमान खानशी घट्ट मैत्री आहे. झहीरची आई गृहिणी आहे. झहीरला एक बहीण आणि एक लहान भाऊ आहे.
-
झहीर इक्बालने २०१९ मध्ये सलमान खानच्या ‘नोटबुक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अभिनेत्री नूतनची नात प्रनूतन बहल त्याच्यासोबत दिसली होती.
-
याशिवाय त्याने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय हो’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे.
-
डीएनएच्या रिपोर्टनुसार, झहीर इक्बाल स्वतः त्याच्या कुटुंबाच्या मालमत्तेव्यतिरिक्त एक ते दोन कोटी रुपयांचा मालक आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील चांगली कमाई करतो.
-
झहीर इक्बाल आतापर्यंत कमी चित्रपटांमध्ये दिसला असला तरीही त्याची जीवनशैली खूपच विलासी आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ एम-क्लास यासारखी आलिशान कार देखील आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी आणि झहीर या महिन्याच्या २३ तारखेला मुंबईतच लग्न करणार आहेत.
-
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हिरामंडी’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. यामध्ये तिने ‘फरीदान’ची भुमिका बजावली. सोनाक्षीच्या अभिनयासाठी चाहत्यांनी तिचे कौतुक केले.
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच