-
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या अर्जुन विवाहबंधनात अडकली आहे.
-
गेले अनेक दिवस तिच्या लग्नाच्या चर्चा होत्या, अखेर अभिनेत्रीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आहे.
-
ऐश्वर्या अर्जुनने तमिळ अभिनेता उमापथी रामैय्याशी १० जून रोजी लग्न केलं आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेते अर्जुन सरजा यांची मोठी लेक ऐश्वर्याने ३२ व्या वर्षी लग्न केलं आहे.
-
ऐश्वर्या अर्जुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
-
ऐश्वर्याने या खास दिवसासाठी लाल रंगाची सिल्क साडी निवडली. भरजरी दागिने, माथापट्टी आणि कपाळावर लाल टिकली लावलेली ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे.
-
उमापथी रामैय्याने लग्नसााठी पांढऱ्या रंगाची सिल्क धोती व कुर्ता घातला होता.
-
अभिनेत्रीच्या वडिलांनी बांधलेल्या हनुमान मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न पार पडलं.
-
ऐश्वर्या अर्जुन आणि उमापथी रामैय्या यांची भेट २०२१ मध्ये तमिळ रिॲलिटी टीव्ही शो ‘सर्व्हायवर’मध्ये झाली होती.
-
या शोच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या जवळ आले.
-
काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २८ ऑक्टोबर २०२३ रोजी खासगी सोहळ्यात साखरपुडा केला होता.
-
दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.
-
तेव्हापासून चाहते या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
-
अखेर हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांना सहजीवनासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत.
-
(फोटो – ऐश्वर्या अर्जुन व उमापथी रामैय्या इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल