-
नुकताच प्रदर्शित झालेला ‘मुंज्या’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघने मुख्य भूमिका साकारली आहे.
-
‘मुंज्या’ सिनेमातील भूमिकेसाठी शर्वरीचं खूप कौतुक होत आहे.
-
शर्वरी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.
-
शर्वरी मनोहर जोशींची नात आहे हे खूप लोकांना माहीत नाही.
-
मनोहर जोशी यांचं यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबईत निधन झालं.
-
शर्वरी मनोहर जोशी यांच्या कन्या नम्रता यांची लेक आहे.
-
तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत.
-
तिची बहीण कस्तुरी आणि आई नम्रता वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत.
-
सुरुवातीला सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं ठरवलेल्या शर्वरीला अभिनयाची फार आवड होती.
-
शर्वरीने लहानपणी नाट्यकार्यशाळांमध्ये भाग घेतला असून शाळेत असताना तिने बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं.
-
‘बंटी बबली २’ चित्रपटातून शर्वरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
-
विकीचा भाऊ सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांनी कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा आहे, मात्र त्यांनी याबाबत जाहीरपणे बोलणं टाळलं आहे.
-
शर्वरीने याआधी ‘प्यार का पंचनामा २’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘सोनू के टिटू की स्विटी’ या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
-

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई