-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे.
-
ती बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्याशी लग्न करणार आहे.
-
या दोघांच्या बॅचलर पार्टीनंतर आता लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
सोनाक्षी सिन्हा यांची एकुलती एक लेक आंतरधर्मीय लग्न करत आहे.
-
हे लग्न कोणत्या धर्माच्या परंपरेने होईल, याबाबत चर्चा सुरू होत्या.
-
आता सोनाक्षीचे होणारे सासरे व झहीरचे वडील इक्बाल रत्नासी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
-
हे लग्न हिंदू किंवा मुस्लीम परंपरेने नव्हे तर नोंदणी पद्धतीने होईल असं इक्बाल रत्नान्सी यांनी सांगितलं.
-
सोनाक्षी व झहीर विशेष विवाह कायदा, १९५४ नुसार लग्न करतील.
-
झहीरचे वडील म्हणाले की २३ जून रोजी हे लग्न वांद्रे येथील कार्टर रोडवरील त्यांच्या घरी होईल.
-
विशेष विवाह कायद्यांतर्गत, जोडप्याने निवडलेल्या ठिकाणी लग्नाच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रार येईल व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करेल.
-
सोनाक्षी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारणार अशा चर्चा होत आहेत.
-
त्याबाबत इक्बाल रत्नासी यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
-
“ती धर्मांतर करणार नाही,” असं इक्बाल रत्नासी म्हणाले.
-
“इथे दोन मनं एकत्र येत आहेत, त्यामुळे यात धर्म हा विषय नाही,” असं इक्बाल रत्नासी म्हणाले.
-
“माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम धर्मीय अल्लाह म्हणतात. पण सरतेशेवटी आपण सर्वजण माणूस आहोत. माझे आशीर्वाद नेहमी झहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहेत,” असं इक्बाल रत्नासी म्हणाले.
-
दरम्यान सोनाक्षी व झहीरच्या लग्नासाठी सिन्हा व रत्नासी कुटुंबीय खूप उत्साहित आहेत.
-
सोनाक्षीच्या लग्नाला जाणार असल्याचं तिचे वडील व दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स