-
आंध्र प्रदेशात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी, १२ जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होत आहेत.
-
त्याबरोबरच जनसेना पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
आज आपण सुपरस्टार पवन कल्याण यांच्या संपूर्ण कुटुंबाबाबत आणि त्यांच्या कुटुंबात किती सुपरस्टार आहेत याबाबत जाणून घेऊया.
-
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेता पवन कल्याण यांच्या कुटुंबात अनेक दिग्गज सुपरस्टार्स आहेत. २ सप्टेंबर १९७१ रोजी जन्मलेले कोनिडेला कल्याण बाबू यांना पवन कल्याण या नावाने ओळखले जातात.
-
पवन कल्याण यांना नागेंद्र बाबू आणि चिरंजीवी असे दोन भाऊ आहेत. पवन कल्याण यांच्या दोन्ही भावांना परिचयाची गरज नाही. ते तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्स आहेत.
-
पवन कल्याणचा मोठा भाऊ चिरंजीवी यांचे लग्न सुरेखा कोनिडेला यांच्याशी झाले असून त्या तेलुगू कॉमेडियन-अभिनेता अल्लू रामलिंगा यांची कन्या आहेत.
-
चिरंजीवी यांना सुष्मिता आणि श्रीजा या दोन मुली असून त्यांच्या मुलाचे नाव रामचरण आहे. रामचरण हा पॅन इंडियाचा सुपरस्टार आहे. याच नात्याने ‘RRR’ स्टार रामचरण हा पवन कल्याण यांचा पुतण्या असल्याचं समजतं.
-
पवन कल्याण यांचा भाऊ नागेंद्र बाबू याचे लग्न पद्मजा कोडिनेलाशी झाले आहे. त्यांना वरुण तेज आणि निहारिका ही दोन मुले आहेत. वरुण तेज अभिनेता असून निहारिका एक अभिनेत्री आणि निर्माता आहे.
-
पवन कल्याण यांना विजय दुर्गा आणि माधवी राव या दोन बहिणी आहेत. विजय दुर्गा यांना दोन पुत्र आहेत – साई धरम तेज आणि पंजा वैष्णव तेज.
-
साई धरम तेज आणि पंजा वैष्णव तेज दोघेही अभिनेते आहेत आणि नातेसंबंधांत ते पवन कल्याण यांचे पुतणे आहेत.
-
पवन कल्याणचा पुतण्या राम चरण आणि ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुन हे देखील नात्याने भाऊ आहेत. अल्लू अर्जुनची आत्या सुरेखा कोनिडेला ही राम चरणची आई आहे.
-
अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद दक्षिणेतील मोठे निर्माता आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट तयार केले आहेत.
-
अल्लू अर्जुनला अल्लू व्यंकटेश आणि अल्लू शिरीष असे आणखी दोन भाऊ आहेत. अल्लू व्यंकटेश हा प्रसिद्ध उद्योगपती आहे तर अल्लू शिरीष हा अभिनेता आहे.

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…