-
९०च्या दशकापासून आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच सोनाली बेंद्रे.
-
सोनालीचे लाखो चाहते असल्याने तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिची आतुरतेने वाट पाहायचे.
-
सोनालीला भेटता यावं म्हणून लोकं खूप प्रयत्न करायचे.
-
सोनाली बेंद्रे एकदा भोपाळला गेली होती. तेव्हा तिच्या एका चाहत्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट झाली नाही. म्हणून त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली होती.
-
सोनालीला याबद्दल एका मुलाखतीत कळलं तेव्हा तिने मीडियाला विचारलं की, “हे खरं आहे का? कसं कोणी स्वत:चा जीव देऊ शकतं?”
-
सोनालीने एकदा असंही सांगितलं होतं की, ९०च्या काळात तिला चाहते पत्र पाठवायचे. तिचे चाहते रक्ताने ते पत्र लिहायचे. हे बघून सोनालीला खूप वाईट वाटायचं.
-
सोनाली म्हणाली होती की, “लोकं कशी काय दुसऱ्यांना इतक्या मोठ्या स्थानी ठेवतात आणि स्वत:च मोल विसरतात.”
-
सोनाली हेदेखील म्हणाली होती की, बॉलीवूड स्टार्ससाठी असलेलं लोकांचं हे वेडेपण तिला समजायचंच नाही.
-
सोनालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री शेवटची ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजध्ये झळकली होती.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार