-
पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमधील लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेता, गायक दिलजित दोसांझ. मात्र हा गायक केवळ पंजाबच नाही तर बॉलीवूड ते हॉलीवूडपर्यंतच्या सर्वच चाहत्यांना वेड लावत आहे.
-
दिलजित दोसांझ त्याच्या ‘अमर सिंग चमकिला’मधील अभिनयामुळे सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला. तर त्याचा ‘जट्ट अँड ज्युलिएट-३’ हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
संपूर्ण जगभरात मोठी फॅन फॉलोविंग असलेला दिलजित त्याचे वैयक्तिक आयुष्य लाईमलाइटपासून दूर ठेवतो. मात्र, एका मुलाखतीत त्याने त्याच्या शालेय जीवनातील एक हास्यास्पद किस्सा सांगितला आहे.
-
दिलजितने आठव्या वर्षी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याने असे का केले, त्यानंतर पुढे काय झाले हे जाणून घेऊया.
-
दिलजित शाळेत असताना त्याला शाळेतील त्याच्याहून मोठी मुलगी आवडायची. इतकंच नाही तर त्याने तिला प्रपोजही केलं. मात्र यानंतर त्याच्यावर घर सोडून पळण्याची वेळ आली.
-
त्याचं झालं असं की, दिलजित शाळेत असताना त्याचे सिनीयर्स त्याला शाळेतील कोणती मुलगी आवडते याबाबत विचारायचे. एक दिवशी दिलजितने त्यांना त्या मुलीचे नाव सांगितले.
-
त्या मुलांनी दिलजितला सल्ला दिला की त्याने त्या मुलीला त्याच्या भावना सांगून टाकाव्यात. इतकंच नाही तर ते दिलजितला म्हणाले की असे केल्यास ती तुझ्याशी लग्नही करेल.
-
मुलांवर विश्वास ठेवून दिलजितने संबंधित मुलीसमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. तो तिला म्हणाला, “आपण दोघे लग्न करूया.” यावेळी दिलजित फक्त आठ वर्षांचा होता.
-
दिलजितचे हे बोलणे ऐकून त्या मुलीला खूपच राग आला आणि तिने शाळेतील शिक्षकाकडे त्याची तक्रार केली. यानंतर त्याच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले. यावेळी दिलजितला असे वाटले की हा दिवस त्याचा अंत आहे.
-
दिलजितने पुढे सांगितले की यानंतर तो घरी आला, फ्रीजमधील काही फळे घेतली आणि त्याची सायकल घेऊन घरातून पळून गेला. काहीच अंतरावर गेल्यावर एका माणसाने त्याला ओळखले आणि घरी परत जाण्यासाठी बजावले.
-
त्या माणसाच्या दबावामुळे दिलजितला घरी परत जावे लागले. मात्र त्यानंतर घरी आल्यावर त्याने पोटदुखीचे नाटक केले आणि तीन दिवस शाळेला दांडी मारली.
-
दरम्यान दिलजितचा ‘जट्ट अँड ज्युलिएट-३’ हा पंजाबी चित्रपट २८ जूनला प्रदर्शित होणार आहे.
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”