-
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक असलेल्या सुनील शेट्टीने ९० च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
सुनील शेट्टीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, जेव्हा त्याने ब्रूस लीला त्याच्या बालपणी (वय ११-१२ व्या वर्षी) पाहिले तेव्हा त्याने मार्शल आर्ट्स करायचं आहे असं ठरवलं होतं. या खेळात अभिनेता खूप चांगला होता.
-
जेव्हा तो मार्शल आर्ट्समध्ये पारंगत झाला तेव्हा त्याने सेन्सी परवेझ मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली इंडो तिबेट बॉर्डर पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वय अवघे १४-१५ वर्षे होते.
-
राजीव राय (दिग्दर्शक) सुनील शेट्टीची ॲक्शन पाहून त्यांचे चाहते झाले आणि अशाप्रकारे अभिनेत्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. मात्र, नंतर तो चित्रपटातून बाहेर पडला. या अभिनेत्याला सुरुवातीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण नंतर हे सर्व चित्रपट बंद झाले.
-
अनेक दिग्दर्शकांनी पोस्टरमध्ये सुनील शेट्टीला पाहिले होते. त्यापैकी एक होता प्रल्हाद (कक्कर). त्याने ‘आरजू’ चित्रपटासाठी सुनील शेट्टीला साइन केले ज्यामध्ये त्याच्यासोबत दीपक शिवदासानी, राज बब्बर आणि शत्रुघ्न सिन्हा होते. पण ९९% शूटिंगनंतर काही कारणास्तव हा चित्रपटही बंद झाला.
-
त्यानंतरही सुनील शेट्टीला अनेक चित्रपटात काम मिळालं पण सगळे चित्रपट बंद पडत राहिले. अभिनेत्याने त्याच्या मुलाखतीत सांगितलं की तो एक ॲथलीट होता, त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या मजबूत होता आणि आयुष्यात आपण कधी हरणार तर कधी जिंकणार हे त्याला माहीत होतं. त्यामुळेच तो कधीही मानसिक नैराश्यात गेला नाही किंवा त्याला कधीही चिंता वाटली नाही.
-
यानंतर त्याला ‘वक्त हमारा है’ आणि ‘बलवान’ हे सिनेमे मिळाले. १९९२ मध्ये सुनील शेट्टीने बलवान या चित्रपटातून सिनेविश्वात प्रवेश केला. हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता. यानंतर या अभिनेत्यात्याच्या मागे चित्रपटांची रांग लागली.
-
‘बलवान’ या डेब्यू चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सुनील शेट्टीने ४० चित्रपट साईन केले होते. वर्षभरात २५-३० चित्रपटांचं शूटिंग करायचा. परिस्थिती अशी होती की ते एका दिवसात तीन चित्रपटांसाठी काम करायचा.
-
All Photos- Social Media
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”