-
ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन खूप विलासी जीवन जगतो. अभिनेत्याकडे अनेक आलिशान कार आणि महागडे बंगले आहेत. या यादीत आणखी अनेक नवीन घरांची भर पडली आहे. (@Abhishek Bachchan/FB)
-
अभिषेक बच्चनने मुंबईत एक नव्हे तर सहा अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. (@Abhishek Bachchan/FB)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली भागात ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये ६ अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. (@Abhishek Bachchan/FB)
-
या घरांची किंमत १५ कोटी २४ लाख रुपये आहे. ४ हजार ८९४ स्क्वेअर फूट एरिया असलेले हे अपार्टमेंट इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर आहे. (@Abhishek Bachchan/FB)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ६ अपार्टमेंटची नोंदणी २८ मे २०२४ रोजी झाली होती. यामध्ये अभिनेत्याला १० कार पार्किंगचीही जागा मिळाली आहे. (@Abhishek Bachchan/FB)
-
अभिषेक बच्चनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर २०२२ मध्ये त्याची एकूण संपत्ती २०३ कोटी रुपये होती. (@Abhishek Bachchan/FB)
-
अभिषेक बच्चन अभिनेता असण्यासोबतच एक यशस्वी बिझनेसमन देखील आहे. त्याच्याकडे सध्या दोन यशस्वी क्रीडा संघ आहेत. यापैकी एक संघ प्रो कबड्डी आहे आणि दुसरा फुटबॉल संघ आहे. (@Abhishek Bachchan/FB)
-
अभिषेक बच्चन देखील ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई करतो. याशिवाय तो एक यशस्वी निर्माताही आहे. एका चित्रपटासाठी तो सुमारे १० कोटी रुपये मानधन घेतो. (@Abhishek Bachchan/FB)
-
अभिषेक बच्चनकडे ऑडी A8L, मर्सिडीज बेंज SL350D, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी आणि मर्सिडीज बेंज AMG अशा इतर अनेक लक्झरी कारचा संग्रह आहे. हेही पहा- PHOTOS : दिल्लीमध्ये उन्हाच्या कडाक्याचा प्राण्यांवरही परिणाम; संरक्षणासाठी वाघांनी श…
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!