-
‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शोच्या इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय कार्यक्रम आहे. हिंदीबरोबरच इतर प्रादेशिक भाषेतही हा कार्यक्रम प्रदर्शित होतो.
-
‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व २१ जूनपासून रात्री ९ वाजता ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे. मात्र यंदाचे वेगळेपण म्हणजे हे पर्व सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहेत.
-
बिग बॉस हा कार्यक्रम सलमान खानशी जोडलेला आहे. बिग बॉसचा होस्ट म्हणून नेहमीच त्याचे नाव पुढे येते. मात्र तुम्हाला या कार्यक्रमाचा पहिला होस्ट कोण होता हे माहीत आहे का?
-
बिग बॉस हा रिॲलिटी शो टेलिव्हिजनवर २००६ साली पहिल्यांदा सोनी टीव्हीवर प्रसारित झाला होता.
-
‘असुर’ फेम अभिनेता अरशद वारसीने सर्वप्रथम ‘बिग बॉस’ शो होस्ट केले होते.
-
अरशद वारसीनंतर ‘बिग ब्रदर’चे पहिले पर्व जिंकलेली शिल्पा शेट्टीने ‘बिग बॉस’चे दुसरे पर्व होस्ट केले होते.
-
इतकंच नाही तर महानायक अमिताभ बच्चन यांनी ही ‘बिगबॉस’ होस्ट केले आहे. त्यांनी २००९ साली ‘बिग बॉस’चे तिसरे पर्व होस्ट केले.
-
कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वानंतर सलमान खानने तब्बल १४ पर्व होस्ट केले आहेत. यादरम्यान त्याच्यासह वेगवेगळे कलाकारही होस्ट करताना दिसले.
-
मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत होते. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”