-
शाहरुख खान आणि फिल्ममेकर फराह खान हे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. फराह खानने किंग खानच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे की, शाहरुखला या चित्रपटात काम करायचे नव्हतं. हा तोच चित्रपट आहे; ज्यानं २६ वर्षांपूर्वी १०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
-
फराह खानने कोरिओग्राफर म्हणून शाहरुख खानसाठी अनेक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. फराह खानने एका मुलाखतीत खुलासा केला, ”किंग खान ‘कुछ कुछ होता है’मधील त्याच्या भूमिकेवर खूश नव्हता.”
-
शाहरुख खान ‘कुछ कुछ होता है’मध्ये कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका करायला तयार नव्हता. विद्यार्थ्याची भूमिका साकारण्यासाठी तो वयानं खूप मोठा आहे, असं त्याला वाटायचं. पण- करण जोहरने खूप समजावून सांगितल्यानंतर त्याने चित्रपटासाठी होकार दिला.
-
फराह खानलाही शाहरुख खानसोबत कॉलेज लाइफवर चित्रपट बनवायचा होता. पण ‘कुछ कुछ होता है’मध्ये जे घडले ते पाहिल्यानंतर शाहरुख खानला मन वळवणे तिला अशक्य आहे, असे वाटले.
-
मुलाखतीत फराह खानने पुढे सांगितले की, ‘मैं हूं ना’ या चित्रपटात तिने शाहरुख खानसोबत चित्रपटात रिव्हर्स इंजिनियरिंगचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. हा चित्रपट भूतकाळापासून सुरू होऊन वर्तमानात जाईल आणि अशा परिस्थितीत शाहरुख खान या चित्रपटात विद्यार्थ्याच्या भूमिकेत सामान्य दिसणार आणि हे ऐकून शाहरुख खानने चित्रपटासाठी होकार दिला.
-
फराह खानने सुरुवातीला ‘मैं हूं ना’ची निर्मिती करताना चित्रपट छोट्या प्रमाणावर करण्याचा विचार केला होता; पण नंतर चित्रपटात पाकिस्तानी अँगल जोडला गेला आणि चित्रपट मोठा झाला.
-
‘कुछ कुछ होता है’ १९९८ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपट बनविण्यासाठी फक्त १० कोटी रुपये खर्च झाले होते आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली होती.
-
२००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं हूं ना’ने बॉक्स ऑफिसवर जवळपास ८९ कोटींची कमाई केली होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल