-
रुपाली गांगुली
‘अनुपमा’ या नावाने घराघरात प्रसिद्ध झालेली रुपाली गांगुली तिच्या वडिलांच्या जाहिरात एजन्सीमधून चांगली कमाई करते. (Photo Source@rupaliganguly/instagram) -
आश्का गोराडिया
‘कुसुम’ आणि ‘सिंदूर तेरे नाम का’ सारख्या मालिकांमध्ये साध्या भोळ्या सुनेची भूमिका साकारणारी आश्का गोराडिया अभिनयासह स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँडचा व्यवसायही चालवते, जो आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. (Photo Source: @aashkagoradia/instagram) -
दिव्यांका त्रिपाठी
टीव्ही इंडस्ट्रीत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मूळ गावी भोपाळमध्ये डान्स अकादमी चालवते. (Photo Source: @divyankatripathidahiya/instagram) -
संजीदा शेख
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘हिरामंडी’ फेम संजीदा शेखही अभिनयासोबतच एका ब्युटी पार्लरची मालकीण आहे. तिच्या ब्युटी पार्लरचे नाव ‘संजीदा पार्लर’ आहे. (Photo Source: @iamsanjeeda/instagram) -
मौनी रॉय
छोट्या पडद्यावर ‘नागिन’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख बनवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय तिच्या पतीसोबत ‘अल्टीमेट गुरुस’ नावाचे एज्युकेशन ॲप चालवते. (Photo Source: @imouniroy/instagram) -
जेनिफर विंगेट
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या स्किन केअर आणि ब्युटी प्रोडक्ट्सच्या ब्रँडमधून खूप पैसे कमवते. (Photo Source: @jenniferwinget1/instagram) -
रक्षंदा खान
‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘तेरे बिना जिया जाये ना’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवणारी रक्षंदा खान स्वतःची मॅनेजमेंट कंपनी चालवते, ज्याद्वारे ती बक्कळ कमाई करते. (Photo Source: @rakshandak27/instagram) -
रुबिना दिलैक
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक डिझायनिंग कंपनीची मालक आहे. (Photo Source: @rubinadilaik/instagram)
(हेही वाचा: PHOTOS : जगातली पहिली ‘एआय’ मॉडेल्स सौंदर्य स्पर्धा; अंतिम फेरीत भारताची ‘झारा शतावरी’! ‘इतकी’ आहे बक्षिसाची रक्कम )

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम