-
वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो.
-
‘कलर्स मराठी’च्या प्रत्येक मालिकेत सध्या वटपौर्णिमा विशेष भाग सुरु आहेत.
-
‘रमा-राघव’ मालिकेत कुटुंब जोडताना राघवची मिळणारी साथ कायम अशीच राहूदेत असं म्हणत रमा वडाची पूजा करणार आहे.
-
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत सावी अन् अर्जुन एकत्र वटपौर्णिमेची पूजा करणार आहेत.
-
‘सुख कळले’ या मालिकेत मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे.
-
‘इंद्रायणी’ मालिकेत वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाणार आहे.
-
तसेच ‘सुख कळले’ मालिकेत माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे, हे शोधून काढणार आहे.
-
आता मालिकांमध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.
-
या सगळ्याच नायिका वटपौर्णिमेसाठी केलेल्या पारंपरिक लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी )
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल