-
सना मकबूल
छोट्या पडद्यावरची अभिनेत्री सना मकबूल यावेळी ‘बिग बॉस ओटीटी ३’ या पर्वत सामील झाली असून बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. सनाने २००९ मध्ये एमटीव्हीच्या शो ‘‘टीन दिवा’’मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘कितनी मोहब्बत है २’, ‘इस प्यार को क्या नाम दूं’ आणि ‘अर्जुन’ सारख्या मालिकांमध्ये काम केले. २०२१ मध्ये फियर ‘फैक्टर: खतरों के खिलाड़ी ११’मध्येही ती दिसली होती. (Photo Source: @divasana/instagram) -
पौलोमी दास
या यादीत छोट्या पडद्यावरची अभिनेत्री पौलामी दासच्या नावाचाही समावेश आहे. कोलकाता येथील रहिवासी असलेल्या पौलोमीने २०१६ मध्ये इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल या कार्यक्रमामध्ये मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘सुहानी सी एक लडकी’, ‘दिल ही तो है’ आणि ‘कार्तिक पौर्णिमा’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. २०२२ आणि २०२३ मध्ये ती ‘नागिन ६’ मध्ये दिसली होती आणि इथूनचं तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. (Photo Source: @poulomipolodas_official/instagram) -
विशाल पांडे
या यादीत सोशल मीडिया इंफ्लुएंसर विशाल पांडेचे नावही आले आहे. भारतात TikTok सुरु असताना विशाल प्रकाशझोतात आला आणि आजही तो इन्स्टाग्राम रीलद्वारे प्रसिद्धी मिळवत आहे. याशिवाय तो अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसला आहे, ज्यापैकी ‘रुला के गया इश्क तेरा’ आणि ‘तू भी रोयेगा’ अशी त्याची गाणी लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामवर विशाल पांडेचे ९ लाख फॉलोअर्स आहेत. (Photo Source: @vishalpandey_21/instagram) -
सना सुलतान
मुंबईत जन्मलेल्या सना सुलतान खानने पंजाबी म्युझिक व्हिडिओंद्वारे लोकप्रियता मिळवली. मुस्लिम कुटुंबातील सनाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने TikTok वर कंटेंटही तयार केला आहे. तसेच इन्स्टाग्रामवरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अनोख्या पद्धतीने उर्दू भाषा बोलण्याची शैली तिच्या चाहत्यांना खास आवडते. (Photo Source: @sanakhan00/instagram) -
चंद्रिका दीक्षित
वडा पाव गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षित देखील बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वाची स्पर्धक असणार आहे. दिल्लीत वडा पाव विकताना व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चंद्रिकाला लोकप्रियता मिळाली. त्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या संख्येने फॉलोअर्स मिळाले आहेत. अशा परिस्थितीत या रिॲलिटी शोमध्ये सर्व प्रेक्षकांचे लक्ष तिच्यावर असणार आहे. (Photo Source: @chandrika.dixit/instagram) -
दीपक चौरसिया
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वामधील नक्की केलेल्या स्पर्धकांच्या यादीत पत्रकार दीपक चौरसिया यांचाही समावेश आहे. ज्येष्ठ पत्रकार दीपक चौरसिया, विविध वृत्तसंस्थांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. याआधी पत्रकार जिग्ना वोराही बिग बॉसच्या दुसर्या पर्वात स्पर्धक म्हणून आल्या होत्या. (Photo Source: Deepak Chaurasia/Facebook) -
साई केतन राव
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता साई केतन राव हा देखील बिग बॉस ओटीटीच्या या पर्वामध्ये स्पर्धक म्हणून येत आहे. ‘मेहंदी है रचने वाली’ मालिकेद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या साईने ‘चासनी’ आणि ‘इमली’ सारख्या शोसह अनेक तेलुगू टीव्ही शो आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनयासोबतच साईला बॉक्सिंगही अवगत आहे, त्याने राज्यस्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला आहे. (Photo Source: @saiketanrao/instagram) -
नीरज गोयत
खेळाडू नीरज गोयतचे नावही निश्चित झालेल्या स्पर्धकांच्या यादीत समाविष्ट आहे. नीरजने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हरियाणाचा बॉक्सिंग आणि मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट नीरज आरआरआर, मुक्काबाज, तुफान आणि अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये याआधी दिसला आहे. (Photo Source: Neeraj Goyat/Facebook) -
शिवानी कुमारी
उत्तर प्रदेशातील अरियारी या छोट्या गावातून येणारी शिवानी कुमारी ही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. नृत्य आणि कॉमेडी व्हिडिओंद्वारे ती लोकांचे मनोरंजन करते. तिच्या आई आणि बहिणींसोबत तिचं ग्रामीण जीवन दाखवण्यासाठीही ती ओळखली जाते. ‘बलमा’ आणि ‘शोर’ या दोन गाण्यांमध्येही ती दिसली आहे. (Photo Source: @shivani__kumari321/instagram) -
लव कटारिया
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या लव कटारियाचे नावही ‘बिग बॉसच्या स्पर्धकांच्या यादीत आले आहे. लव कटारिया हा एक यूट्यूबर, मॉडेल, अभिनेता आणि व्यवसायिक आहे, जो त्याच्या चॅनेलवर मजेदार व्हिडिओ आणि व्लॉग बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना दिल्लीत चित्रित केलेले काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने आपले चॅनल सुरू केले. (Photo Source: @corrupt_tuber/instagram) -
नेझी
यावेळी बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांमध्ये रॅपर ‘नेझी’चे नावही सामील आहे. नावेद शेख उर्फ नेझी हा मुंबईतील रॅपर आहे जो त्याच्या स्ट्रीट हिप-हॉप शैलीसाठी ओळखला जातो. त्याच्या हिट गाण्यांमध्ये ‘रास्ते मुश्किल’, ‘असल हसल’, ‘हक है’, ‘तहलका’, ‘आझाद हूँ मैं’, ‘मेरे गली में’ यांचा समावेश आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट अभिनित ‘गली बॉय’ हा चित्रपट नेझीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. (Photo Source:naezythebaa/instagram) -
मुनिषा खटवानी
स्पर्धकांच्या यादीत अभिनेत्री आणि टॅरो कार्ड रीडर मुनिषा खटवानीचे नावही आले आहे. मुनिषा जस्ट मोहब्बत, अपना परा आणि तंत्र या टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. मुनिषा ही एक ज्योतिषी असून मुंबईच्या पार्टी सर्किटममध्ये ती खूप प्रसिद्ध आहे. (Photo Source: munishakhatwani/instagram) -
अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका
या रिॲलिटी शोमध्ये यूट्यूबर अरमान मलिकही सहभागी होणार आहे. तो त्याच्या दोन पत्नी पायल मलिक आणि कृतिका मलिकसोबत या शोमध्ये सहभागी होणार आहे. शोमध्ये अशी जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे.(Photo Source: @armaan__malik9/instagram) (हे पण वाचा: PHOTOS : रुपाली गांगुली, दिव्यांका त्रिपाठीसह छोट्या पडद्यावरील ‘या’ अभिनेत्रींचे विविध व्यवसाय; करतात बक्कळ कमाई! )
Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम