-
‘मुंज्या’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. कोकणातील लोककथेवर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. परिणामी चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत बजेट वसूल केलं आहे.
-
‘मुंज्या’ चित्रपटाचं बजेट ३० कोटी रुपये आहे. बजेटची रक्कम या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या सहा दिवसांत वसूल केली आहे. बॉक्स ऑफिसवर अवघ्या सहा दिवसांत चित्रपटाने ३१.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
-
या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.
-
दरम्यान, ‘मुंज्या’ या चित्रपटातील कामामुळे अभिनेता अभय वर्मा चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनयाबरोबरच त्याचे क्यूट लूक्स पाहून महिला चाहतावर्ग घायाळ झाला आहे.
-
अभयने ‘मुंज्या’च्या आधी ‘फॅमिली मॅन’, ‘ए वतन मेरे वतन’, ‘सफेदी’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.
-
अशातच अभय वर्माची गर्लफ्रेंड कोण आहे, त्याची लव्हलाइफ कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी तरुणी उत्सुक आहेत. आज आपण अभयच्या गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेऊया.
-
अभय वर्माने अलीकडेच बॉलीवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या रिलेशनशिपबाबतच्या अफवांबाबत मौन सोडले आहे.
-
या मुलाखतीत त्याने खुलासा केला की तो अद्याप सिंगल आहे. मात्र त्याने होणारा जोडीदार कसा असावा याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे.
-
अभयने सांगितले की त्याला मॉडर्न मात्र तितकीच भारतीय मुळांना धरून असलेली जोडीदार हवी आहे. तसेच त्या मुलीसह त्याची समजूतदार मैत्री असावी असेही त्याला वाटते.
-
यावरून असे लक्षात येते की अभय त्याच्या नात्यामध्ये मैत्री आणि समजूतदारपणाला विशेष महत्त्व देतो.
-
दरम्यान, चाहत्यांना अभयचे हे मत फारच आवडले असून ते त्याच्या भावी जीवनासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.
-
चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. कोकणातील लोककथांवर आधारित हा चित्रपट आहे.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल