-
सेलिब्रिटींच्या ब्रँड व्हॅल्यूबाबत नुकताच एक अहवाल समोर आला आहे. या यादीत बॉलीवूडपासून ते क्रीडा जगतातील स्टार्सचा समावेश आहे. बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंगने गेल्या वर्षीच्या यादीत टॉप सेलिब्रिटी म्हणून आपले स्थान निर्माण केले होते. मात्र यंदाच्या यादीत त्याला एका भारतीय क्रिकेटपटूने मागे टाकले आहे.
-
विराट कोहली
खरंतर, क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा देशातील सर्वात महागडा सेलिब्रिटी बनला आहे. क्रोलच्या ताज्या ‘सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन’ अहवालात त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०२३ मध्ये माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू सुमारे २२७.९ मिलियन डॉलर होती. (Photo Source: Virat Kohli/Facebook) -
रणवीर सिंग
त्याचवेळी बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने वाहवाह मिळवणारा अभिनेता रणवीर सिंग ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर घसरला. वर्षभरापूर्वी तो या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. २०२३ मध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू २०३.१ मिलियन डॉलर होती. (Photo Source: Ranveer Singh/Facebook) -
शाहरुख खान
बॉलीवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. किंग खान १२०.७ मिलियन डॉलर इतक्या ब्रँड व्हॅल्यूसह या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी तो या यादीत दहाव्या क्रमांकावर होता. (Photo Source: Shah Rukh Khan/Facebook) -
अक्षय कुमार
शाहरुख खानच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाल्याने या यादीत इतर सेलिब्रिटीही मागे पडले आहेत. अक्षय कुमार गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानावर होता, परंतु २०२३ मध्ये तो १११.७ मिलियन डॉलरसह चौथ्या स्थानावर आला आहे. (Photo Source: Akshay Kumar/Facebook) -
आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्टचे नाव पाचव्या स्थानावर आहे. आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू १०१.१ मिलियन डॉलर आहे. गेल्या वर्षी ती चौथ्या क्रमांकावर होती. दरम्यान टॉप ५ मध्ये स्थान मिळवणारी आलिया ही एकमेव महिला सेलिब्रिटी आहे. (Photo Source: Alia Bhatt/Facebook) -
दीपिका पदुकोण
तर पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर आलेल्या दीपिका पदुकोणची ब्रँड व्हॅल्यू ९६ मिलियन डॉलर आहे. (Photo Source: Deepika Padukone/Facebook) -
एमएस धोनी
एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचाही टॉप १० मध्ये समावेश आहे. यादीत ७ वे स्थान मिळविणाऱ्या एमएस धोनीची ब्रँड व्हॅल्यू ९५.८ मिलियन डॉलर आहे. (Photo Source: MS Dhoni/Facebook) -
सचिन तेंडुलकर
तर निवृत्त क्रिकेटर सचिन तेंडुलकर या यादीत आठव्या स्थानावर आहे ज्याची ब्रँड व्हॅल्यू ९१.३ मिलियन डॉलर आहे. (Photo Source: Sachin Tendulkar/Facebook) -
अमिताभ बच्चन
बॉलीवूड शहेनशाह अमिताभ बच्चन, जे गेल्या वर्षी सातव्या क्रमांकावर होते, ते ८३.६ मिलियन डॉलर ब्रँड मूल्यासह नवव्या स्थानावर घसरले आहेत. (Photo Source: Amitabh Bachchan/Facebook) -
सलमान खान
त्याच वेळी, या यादीत, बॉलीवूडचा दबंग सलमान खान ८१.७ मिलियन डॉलर ब्रँड मूल्यासह टॉप १० मध्ये सामील झाला आहे. गेल्या वर्षी तो अकराव्या क्रमांकावर होता. (Photo Source: Salman Khan/Facebook) (हे देखील वाचा: PHOTOS : पत्रकार दीपक चौरसिया, वडा पाव गर्ल चंद्रिका ते साई केतन; ‘हे’ आहेत बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या पर्वातील स्पर्धक! )

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश