-
जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.
-
जिनिलीया नेहमीच मराठी सण मोठ्या उत्साहाने साजरे करत असल्याचं पाहायला मिळतं.
-
अभिनेत्रीने नुकतीच वटपौर्णिमा साजरी केली.
-
जिनिलीयाने वडाची पूजा करून सोशल मीडियावर रितेशसाठी एक खास पोस्ट लिहिली.
-
“माझे प्रिय नवरोबा रितेश… तुमच्याशिवाय एक दिवसही जाणं कठीण! तुम्हाला माझं आयुष्य ही लाभो” असं जिनिलीयाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
बायकोचा हा व्हिडीओ शेअर करत रितेशने देखील जिनिलीयाचं भरभरून कौतुक केलं आहे.
-
“बायको तू माझी हार्टबीट आहेस” असं रितेशने पत्नीचं कौतुक करत म्हटलं आहे.
-
जिनिलीयाचा हा वटपौर्णिमेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
दरम्यान, रितेश-जिनिलीयावर नेटकरी नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. ( सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख इन्स्टाग्राम )

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”