-
‘पंचायत’ या वेबसीरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. तिसरा सीझनही लोकांना खूप आवडला आहे. ही या वर्षातील सर्वाधिक पसंतीची ववेबसीरीज बनली आहे. सीरीजची कथा आणि पात्रांची लोकांमध्ये खूप चर्चा आहे.
-
पंचायत ३ मध्ये अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले. जगमोहन यांच्या संपूर्ण कुटुंबाचाही या समावेश आहे. या सीरीजमध्ये जगमोहनच्या कुटुंबाला घरापुढील रस्ता आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतःसाठी घर हवे असते. या कथानकावर एक संपूर्ण एपिसोड चित्रित करण्यात आला आहे.
-
अप्रतिम अभिनेत्री असलेल्या कल्याणी खत्रीने या सीरीजमध्ये जगमोहनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. मालिकेत हिरव्या रंगाची साडी नेसून साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
-
कल्याणीला फिल्म इंडस्ट्रीत बराच काळ लोटला आहे, मात्र ही वेबसिरीज प्रदर्शित झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. मालिकेतील आपल्या अभिनयाने या अभिनेत्रीने लोकांची मने जिंकली आहेत.
-
अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यासोबतच तिने इंडस्ट्रीबाबतही धक्कादायक खुलासे केले आहेत.
-
कल्याणीने सांगितले की, इंडस्ट्रीत अनेक प्रोडक्शन हाऊस आहेत जे ज्युनियर कलाकारांच्या जेवणात सोडा मिसळतात. अभिनेत्री पुढे म्हणाली, “कधीकधी जेवण करताना तुम्हाला तुमच्या घशात एक वेगळी जळजळ जाणवते, ते जेवण सोडा मिसळलेले असते.”
-
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जेवणात सोडा घातल्याने पोट लवकर भरते आणि लोकं कमी खातात. असे यासाठी केले जाते की जी लोकं जास्त खातात त्यांची पोट कमी जेवणाने लवकर भरतात.”
-
अभिनेत्री म्हणाली, “अन्नामध्ये सोडा मिसळल्याने काहीही नुकसान होत नाही, कारण बरेच लोक अन्न पचवण्यासाठी सोड्याचा वापर करतात. पण अनेकांचे नुकसान सुद्धा होते. त्यामुळेच मी घरूनच जेवणाचा डबा आणते आणि तो खाते.”
-
अभिनेत्री कल्याणी खत्रीबद्दल सांगायचे तर, तिच्या अभिनयासाठी तिला २०१६ मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला आहे. अभिनेत्रीला हा पुरस्कार तिच्या पहिल्या फिचर फिल्म ‘प्रेमातुर’साठी मिळाला होता. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.
-
कल्याणी खत्रीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. ‘डॉ. बीआर आंबेडकर’ या मालिकेत तिने बालविवाह निषेधाच्या एका एपिसोडमध्ये काम केले आहे, तिने रेणुका नावाचे पात्र साकारले होते. त्याच वेळी ती ‘राधा कृष्ण’ मालिकेमध्ये गोपी बनली होती. त्याचबरोबर ती ‘लेडीज स्पेशल’ या मालिकेतही अभिनय करताना दिसली होती. (Photos Source: @iamkalyanikhatri/instagram) (हे देखील वाचा:Celebrity Brand Valuation Report 2023: रणवीर सिंगने शाहरुखला टाकले मागे, ‘हा’ क्रिकेटर बनला भारताचा ‘टॉप ब्रँड व्हॅल्यूएबल सेलिब्रिटी)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश