-
हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ हा भारतीय संस्कृती आणि बॉलिवूडचा मोठा चाहता आहे. त्यानी भारताला अनेकदा भेट दिली आहे. अभिनेत्याला भारतीय जेवण देखील आवडते. विलला बटर चिकन आणि नान खूप आवडतात. (फोटो स्रोत: विल स्मिथ/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सला भारतावर आणि देशाच्या संस्कृतिवर खूप प्रेम आहे. ‘इट, प्रे, लव्ह’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आलेल्या ज्युलियाने २००९ मध्ये हिंदू धर्म स्वीकारला. ज्युलिया आपल्या पती आणि तीन मुलांसह प्रार्थना करण्यासाठी मंदिरांमध्येही जाते आणि दिवाळीसह सर्व हिंदू सण देखील साजरे करते. (फोटो स्रोत: ज्युलिया रॉबर्ट्स/इन्स्टाग्राम)
-
जेरार्ड बटलरने अनेकवेळा भारताला भेट दिली आहे आणि त्यांना भारतीय जेवण देखील आवडते. बॉलीवूड आणि भारतीय संस्कृतीतही त्यांनी रस दाखवला आहे. (फोटो स्रोत: जेरार्ड बटलर/इन्स्टाग्राम)
-
हॅले बेरीने भारतीय खाद्यपदार्थ तंदूरी चिकन आणि समोसे यांसारख्या खास पदार्थांवर आपले प्रेम व्यक्त केले आहे. याशिवाय त्यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्मातही रस दाखवला आहे. (फोटो स्रोत: हॅले बेरी/इन्स्टाग्राम)
-
जॉनी डेपलाही भारतीय जेवणाचा शौक आहे. एकदा बर्मिंगहॅममध्ये त्यांनी एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी ४८ लाख रुपये खर्च केले होते. (फोटो स्रोत: जॉनी डेप/इन्स्टाग्राम)
-
अभिनेता टॉम क्रूझला भारतीय पदार्थ खूप आवडतात. एकदा त्यांनी गायिका आशा भोसले यांच्या ब्रिटनमधील रेस्टॉरंटमध्ये चिकन टिक्का मसाला खाल्ला होता. रेस्टॉरंटनुसार, अभिनेत्याला ही डिश इतकी आवडली की त्याने ती पुन्हा ती ऑर्डर केली. (फोटो स्रोत: टॉम क्रूझ/इन्स्टाग्राम)
-
लेडी गागा यांनीही भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीतात रस दाखवला आहे. भारतीय खाद्यपदार्थ आणि संस्कृतीबद्दलचे प्रेमही त्यांनी अनेकदा व्यक्त केले आहे. (फोटो स्त्रोत: लेडी गागा/इन्स्टाग्राम)
-
अभिनेता ह्यू जॅकमन देखील हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात आणि त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की ते हिंदू धर्मामुळे आकर्षित झाले, त्यानंतर त्यांनी उपनिषद आणि भागवत गीता वाचण्यास सुरुवात केली. (फोटो स्रोत: ह्यू जॅकमन/इन्स्टाग्राम)
-
रॉबर्ट पॅटिन्सनला भारतीय डिश चिकन कबाब खूप आवडते. लंडन असो किंवा न्यूयॉर्क अभिनेता भारतीय रेस्टॉरंटमध्ये मसालेदार करी खाण्यासाठी नक्कीच जातो. ‘टेनेट’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आलेल्या रॉबर्टने बटर चिकनसाठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंटमध्येही भेट दिली होती.
(फोटो स्रोत: रॉबर्ट पॅटिन्सन/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”