-
‘गुलक’ या वेब सीरिजचा चौथा सीझन आला असून प्रत्येक सीझनप्रमाणे हा सीझनही प्रेक्षकांना आवडला आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही मालिका सर्वांच्याच मनाला भिडली आहे. या शोमधील सर्वच पात्रांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.
-
या प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे शांती मिश्रा. मालिकेतील या पत्राला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आहे. जाणून घेऊया शांती मिश्राची भूमिका साकारनाऱ्या अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी बद्दल.
-
या मालिकेत गीतांजली एका आईची भूमिका साकारत आहे जी आपल्या घरची काळजी घेण्याचे आणि आपल्या दोन्ही मुलांचे चांगले संगोपन करण्याचे स्वप्न पाहते. या शोमध्ये अभिनेत्रीची व्यक्तिरेखा साधी साडी नेसलेल्या गृहिणीची दाखवली आहे.
-
अभिनेत्री गीतांजली खऱ्या आयुष्यात अगदी फॅशनेबल आहे. अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंट अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.
-
गीतांजली कुलकर्णी ही एक मराठी अभिनेत्री आहे आणि तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा पूर्ण करत असताना गीतांजली आणि अभिनेता अतुल कुलकर्णी यांची भेट झाली.
-
अतुल हे गीतांजलीचे एनएसडी मध्ये सिनियर होते. अभ्यासादरम्यान दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १९९६ साली त्यांनी लग्न केले.
-
अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी ‘रईस’, ‘द अटॅक्स ऑफ 26/11’, ‘बम बम बोले’, ‘दिल्ली 6’, ‘रंग दे बसंती’, ‘खाकी’ आणि ‘चांदनी बार’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये कामं केले आहे.
(सर्व फोटो: गीतांजली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : ‘मी शिंदेंना सांगणार, कडक समज द्या, अन्यथा…’, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून फडणवीसांचा मोठा इशारा