-
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. दोघांनी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं आहे.
-
सोनाक्षीनं लग्नातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लग्नातील फोटो शेअर करत सोनाक्षीनं लिहिलं आहे, “आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी (२३.०६.२०१७) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं आहे. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. “
-
पुढे अभिनेत्रीनं लिहिलं, “आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादानं आता आम्ही नवरा आणि बायको झालो आहोत…सोनाक्षी आणि झहीर…२३.०६.२०२४”
-
लग्नासाठी सोनाक्षीनं खास ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसली होती. ज्यावर मॅचिंग चोकर, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. तसंच केसात गजरा माळला होता.
-
तर सोनाक्षीचा नवरा झहीरनं तिला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
सोनाक्षी व झहीरच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
लग्नाच्या एका व्हिडीओमध्ये झहीर सोनाक्षीला मिठी मारून किस करताना पाहायला मिळाला.
-
(सर्व फोटो सौजन्य – सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम आणि Bollywood Five इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”