-
बिगबॉस ओटीटीचे तिसरे पर्व सुरू झाले असून पहिल्याच दिवसापासून स्पर्धकांमध्ये चुरसीची लढाई पाहायला मिळते आहे.
-
पत्रकार, मॉडेल, अभिनेत्री, युट्यूबर, रॅपर, कुस्तीपटू अशा सगळ्या क्षेत्रातील स्पर्धकांची ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री झाली आहे.
-
‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात सना मकबूल, पौलोमी दास, विशाल पांडे, सना सुलतान, चंद्रिका दीक्षित, दीपक चौरसिया, साई केतक राव, नीरज गोयत, शिवानी कुमारी, लव कटारिया, नेझी, मुनिषा खटवानी, अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक आणि रणवीर शौरी हे स्पर्धक आहेत.
-
अशातच हरियाणाचा बॉक्सर सध्या बिग बॉस ओटीटी 3 च्या घरात धुमाकूळ घालत आहे.
-
हरियाणवी बॉक्सर नीरज गोयतने बॉक्सिंग रिंगपासून चित्रपटाच्या पडद्यावर खळबळ माजवली आहे. नीरजला या सीझनचा डार्क हॉर्स मानले जात आहे.
-
नीरजने आपल्या अनोख्या शैलीने इतर लोकांनाही प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, येणाऱ्या दिवसांमध्ये नीरजचा खेळ कसा असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.
-
नीरज गोयतबद्दल सांगायचे तर, तो एक व्यावसायिक बॉक्सर असून एक चांगला प्रशिक्षक देखील आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये बड्या स्टार्सना फाईट सिक्वेन्समध्ये मदत केली आहे.
-
तो हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याने २००८ मध्ये सर्वात कुशल बॉक्सरचा किताब पटकावला आहे. त्याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर, नीरजने अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’ चित्रपटातून पदार्पण केले.
-
यानंतर त्याने ‘तुफान’ चित्रपटातही बॉक्सरची भूमिका साकारली होती. नीरज गोयतने RRR चित्रपटातही काम केले होते. या चित्रपटात नीरजने सुपरस्टार रामचरणला अनेक फाईट सीक्वेन्समध्येही मदत केली होती.
-
दरम्यान, नीरज यादवने बिग बॉसचा विजेता अलविश यादव यांच्याबाबतही एक कठोर विधान केले आहे. ‘तुम्हीही एल्विश यादवप्रमाणे घरात खळबळ माजवणार का?’, असे विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, ‘एल्विश यादव कोण आहे हे मला माहीत नाही.’
-
तो पुढे म्हणाला, ‘मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही जो देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या बॉक्सरला ओळखत नाही. एल्विश यादवने बॉक्सर विजेंद्र कुमारला ओळखण्यास नकार दिला होता, यावरून नीरजने हे वक्तव्य केले होते.
-
All Photos : Neeraj Goyat/Instagram
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच