-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल रविवारी (२३ जून) लग्नबंधनात अडकले.
-
सोनाक्षी व झहीर यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं.
-
विशेष विवाह कायद्यांतर्गत दोघांनी आंतरधर्मीय लग्न केलं.
-
रविवारी संध्याकाळी बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये दोघांच्या रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
-
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल त्यांच्या रिसेप्शनमध्ये खूपच सुंदर दिसत होते.
-
सोनाक्षीने रिसेप्शनसाठी लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती.
-
तर एक नेकलेस व कानातले घालून तिने तिचा लूक पूर्ण केला.
-
केसात गजरा, भांगेत कुंकू आणि साध्या मेकअपमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती.
-
तर झहीरने पांढरी शेरवानी घातली होती.
-
सोनाक्षीने तिच्या रिसेप्शनमध्ये नेसलेल्या लाल बनारसी साडीची किंमत समोर आली आहे.
-
तिने नेसलेली साडी ही फार महाग नव्हती.
-
सोनाक्षी सिन्हाच्या साडीची किंमत ८० हजार रुपये आहे.
-
सोनाक्षीने लग्नातही तिच्या आईच्या लग्नातील ४४ वर्षे जुनी साडी नेसली होती.
-
सोनाक्षी लग्न व रिसेप्शन लूकची खूप चर्चा होत आहे.
-
(सर्व फोटो – फिल्मीज्ञान व इन्स्टंट बॉलीवूड इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”