-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले आणि त्यांच्या आयुष्याचा नवा टप्पा सुरू झाला. (@ aslisona /Insta)
-
त्यांच्या लग्नानंतर मुंबईत एका रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते ज्यात बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. रेखा, काजोल, अनिल कपूर, सलमान खान, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी आणि सिद्धार्थशिवाय अनेक स्टार्स पार्टीत दिसले. (पीटीआय)
-
नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या सोनाक्षी व झहीरपैकी कोण जास्त शिकलेलं आहे हे जाणून घेऊया. (पीटीआय)
-
सोनाक्षी सिन्हाबद्दल सांगायचं झाल्यास अभिनेत्रीने तिचे सुरुवातीचे शिक्षण आर्य विद्या मंदिरातून केले आहे. यानंतर तिने श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून फॅशन डिझायनिंग प्रोग्राममध्ये डिग्री पूर्ण केली. (@ aslisona /Insta)
-
यानंतर सोनाक्षीने काही काळ कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम केले. त्याचवेळी २००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘मेरा दिल लेके देखो’ या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाने कॉस्च्युम डिझाइन केले होते. (@ aslisona /Insta)
-
आता तिचा पती आणि अभिनेता झहीर इक्बालबद्दल बोलायचं झाल्यास त्याने सुरुवातीचे शिक्षण मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण केले. रणबीर कपूरही याच शाळेतून शिकला होता. (पीटीआय)
-
झहीर इक्बालच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही पण जर मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने डिग्री पूर्ण केली आणि मग वडिलांच्या बिझनेसमध्ये काम करत होता. (पीटीआय)
-
झहीर इक्बाल हा मुंबईतील सुप्रसिद्ध ज्वेलर्स आणि व्यावसायिक इक्बाल रत्नासी यांचा मुलगा आहे. इक्बाल रत्नासी आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत. झहीरला सलमान खानने चित्रपटांमध्ये लाँच केले होते. (पीटीआय)
-
सध्या सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते या सुंदर जोडप्याला सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत. (पीटीआय)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”