-
मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
आपल्या अभिनयाने नाना यांनी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
नाना यांनी चित्रपटांमध्ये कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका साकारल्या आहेत.
-
काही दिवासांपूर्वी नाना यांनी ‘द लल्लनटॉप’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
-
या मुलाखतीत नाना यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या.
-
नाना पाटेकर यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे.
-
लोक त्यांना प्रेमाने ‘नाना’ या नावाने हाक मारतात.
-
नाना यांच्या पत्नीचं नाव नीलकांती पाटेकर असे आहे.
-
एका नाटकादरम्यान नाना आणि नीलकांती यांची भेट झाली होती.
-
नाना आणि नीलकांती यांना मल्हार नावाचा मुलगा आहे.
-
जानेवारी महिन्यात नाना यांचा ‘ओले आले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
नाना आणि अभिनेते मकरंद अनासपुरे हे दोघेही नाम फाऊंडेशन ही संस्था चालवतात.
-
या संस्थेद्वारे शिक्षण, अनाथ मुलं, दुष्काळ पीडित आणि शेतकऱ्यांना मदत केली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नाना पाटेकर/इन्स्टाग्राम)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य