-
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या मैत्रीणीचं म्हणजेच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं लग्न नुकतंच पार पडलं.
-
यादरम्यान आता हुमाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय.
-
सोनाक्षीच्या लग्नात हुमा तिच्या कथित बॉयफ्रेंडबरोबर म्हणजेच रचित सिंहबरोबर ट्वीनिंग करताना दिसली.
-
दोघांना लग्नात एकत्र पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चाहत्यांना असं वाटतंय की आता सोनाक्षीनंतर हुमा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
-
हुमा कुरेशीचा कथित बॉयफ्रेंड रचित सिंह एक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि अभिनेता आहे.
-
रिपोर्ट्सनुसार रचितने आलिया भट्ट, विकी कौशल, रणवीर सिंह, विकी कौशल, वरुण धवन, अनुष्का शर्मा, सैफ अली खानसारख्या प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम केलंय.
-
रचित सिंह रवीना टंडनची वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’मध्येदेखील झळकला आहे.
-
सोनाक्षीच्या लग्नाआधी हुमा आणि रचित शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते.
-
हुमा आणि रचितच्या रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान दोघांपैकी कोणीही याबाबत अधिकृत खुलासा केला नाही आहे.(All Photos- Social Media)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य