-
भारतातून विदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या लग्नबंधनात अडकला आहे.
-
सिद्धार्थ मल्ल्यानं गर्लफ्रेंड जॅस्मिनशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
-
सिद्धार्थनं २३ जूनला लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंदाची बातमी सांगितली. “MR & Mrs Muppet”, असं लिहित सिद्धार्थाने लग्नातील खास क्षण शेअर केले.
-
या फोटोमधून सिद्धार्थनं जॅस्मिनशी ख्रिश्चिन पद्धतीत लग्न केल्याचं समोर आलं होतं. पण हिंदू पद्धतीतही दोघांनी लग्न केलं आहे.
-
हिंदू पद्धतीतील सिद्धार्थ व जॅस्मिनच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
ख्रिश्चिन पद्धतीत लग्न करताना जॅस्मिनने पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. तर सिद्धार्थ सॉलिड हिरव्या रंगाच्या वेलवेट सूट जॅकेटवर काळ्या रंगाच्या ट्राउजरमध्ये पाहायला मिळाला.
-
हिंदू पद्धतीमधील लग्नात सिद्धार्थनं निळ्या रंगाची स्टायलिश शेरवानी परिधान केली होती. तर जॅस्मिन सुंदर लेहेंग्यात दिसली.
-
लंडनमध्ये सिद्धार्थ व जॅस्मिनचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. या लग्नात हॉलीवूडचे काही कलाकार देखील पाहायला मिळाले.
-
दरम्यान, सिद्धार्थ मल्ल्यानं जॅस्मिनला २०२३ साली कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका हॅलोविन पार्टीमध्ये प्रपोज केलं होतं.
-
सिद्धार्थ मल्ल्याप्रमाणेच जॅस्मिन हीदेखील आधी मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती.
-
सिद्धार्थ मल्ल्याचं नाव बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणशी जोडलं गेलं होतं. बऱ्याच वर्षांपूर्वी दोघं एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. पण हे नातं जास्त काळ टिकलं नाही.
-
याशिवाय सिद्धार्थचं नाव अनुष्का शर्माशी देखील जोडलं होतं. पण सिद्धार्थनं या अफवा असल्याचं स्वतः सांगितलं होतं. तसंच त्यावेळेस दीपिकाबरोबरच्या नात्याचा त्यानं खुलासा केला होता. (सर्व फोटो सौजन्य – सिद्धार्थ मल्ल्या इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेस)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO