-
बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. अर्जुन कपूरने आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
२०१२ साली ‘इश्कजादे’ चित्रपटाद्वारे अर्जुनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अर्जुनने अभिनयात नाव कमावण्यासोबतच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कोट्यवधीची संपत्ती कमवली आहे.
-
अर्जुन कपूरकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शनदेखील आहे आणि मुंबईत एक आलिशान घरही आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूरची एकूण संपत्ती ११ मिलियन डॉलर्स म्हणजे ८५ कोटी रुपये आहे. या अभिनेत्याची बहुतेक कमाई चित्रपट आणि ब्रॅण्ड एंडोर्समेंटमधून होते.
-
अर्जुन कपूर एका चित्रपटासाठी आठ ते १० कोटी रुपयांचे मानधन घेतो. त्यासह ब्रॅण्ड एंडोर्समेंटसाठी तो सुमारे ६० लाख रुपये घेतो.
-
अर्जुन कपूरच्या वार्षिक कमाईबद्दल बोलायचे झाले, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो दरवर्षी सुमारे १० कोटी रुपये कमावतो.
-
अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. अर्जुन कपूरकडे २.४३ कोटी रुपयांच्या मर्सिडीज मेबॅक, लॅण्ड रोव्हर डिफेंडर व्होल्व्हो, मासेराती लेवांटे यांसारख्या लक्झरी गाड्या आहेत.
-
अर्जुन कपूरचा मुंबईतील जुहू येथे एक आलिशान फ्लॅट आहे; जिथे तो आपल्या बहीण अंशुला कपूरसोबत राहतो. त्याशिवाय त्याच्याकडे वांद्रे येथेही एक फ्लॅट आहे; ज्याची किंमत सुमारे २३ कोटी रुपये आहे.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”