-
रिॲलिटी शो स्टार प्रिन्स नरुला व अभिनेत्री युविका चौधरी यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो पोस्ट करीत एक गोड बातमी शेअर केली आहे.
-
प्रिन्स व युविका लवकरच आपल्या घरी एका नवीन पाहुण्याचं स्वागत करणार आहेत. फोटो पोस्ट करीत जोडप्याने प्रेग्नन्सीची घोषणा केली.
-
प्रिन्सने इन्स्टाग्रामवर त्याच्या मोठ्या कारशेजारी खेळण्यातील एका लहान कारचा फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने, ”मला माझ्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे कळत नाही. कारण- आम्ही आनंदी असलो तरी चिंतेतही आहोत. आम्ही देवाचे आणि आमच्या पालकांचे आभारी आहोत. माला माझ्या मुलाला एक चांगला माणूस बनवायचं आहे आणि यापुढे माझं पहिलं प्राधान्य युविका नसून आमचं बाळ असेल”, अशी गंमत केली.
-
त्याने पुढे लिहिले, “आम्हाला ही गोड बातमी दिल्याबद्दल मी फक्त देवाचे आभार मानतो.”
-
प्रिन्सच्या या फोटोवर चाहत्यांनी अभिनंदन करीत त्याला आणि युविकाला शुभेच्छा दिल्या.
-
या फोटोवर अनेक कलाकारांनीही आपल्या शुभेच्छा देऊन जोडप्याचे अभिनंदन केले.
-
(सर्व फोटो : प्रिन्स नरुला/युविका चौधरी/इन्स्टाग्राम अकाऊंट)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”