-
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली गांगुली ‘अनुपमा’ द्वारे पुन्हा एकदा सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. रुपालीने स्वतःच्या मेहनतीने खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.
-
सध्या अभिनेत्री रुपाली गांगुलीची टीव्ही इंडस्ट्रीत वेगळीच क्रेझ आहे. रुपाली गांगुलीने टीव्ही शो ‘अनुपमा’मध्ये काम केल्यापासून ती घराघरात प्रसिद्ध झाली आहे.
-
मात्र खूप कमी लोकांना माहीत असेल की रुपालीला ‘अनुपमा’ ही मालिका करायची नव्हती, पण नंतर रुपालीने आपला निर्णय बदलला. चला जाणून घेऊया यामागची रंजक गोष्ट.
-
रुपालीच्या ‘अनुपमा’ या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. तिचा साधा अनुभव आणि साधी वागणूक प्रेक्षकांना खूपच आवडते. इतकंच नाही तर चाहते तिच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात.
-
रुपाली गांगुली आज यशाच्या शिखरावर आहे. मात्र तिथे पोहोचण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला आहे.
-
रुपाली गांगुलीने पहिल्यांदा ‘सुकन्या’ या टीव्ही शोमध्ये काम केले होते. या शोमध्ये काम केल्यानंतर तिने इतरही अनेक शोमध्ये काम केले.
-
यानंतर रुपालीला ‘संजीवनी’मधील उत्कृष्ट कामासाठी इंडियन टेली अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी नामांकनही मिळाले.
-
यानंतर रुपाली ‘भाभी’, ‘कहानी घर घर की’, ‘बिग बॉस 1’ आणि ‘अदालत’ सारख्या अनेक शोमध्ये दिसली.
-
इंडस्ट्रीत इतकं काम करूनही रुपालीला विशेष ओळख मिळवता आली नाही नव्हती. मात्र, त्यानंतर राजन शाही प्रॉडक्शनची ‘अनुपमा’ ही मालिका आली. या शोसाठी निवड होण्यापूर्वी रुपाली ब्रेकवर होती.
-
गरोदरपणात आलेल्या अडचणींमुळे रुपाली गांगुलीने अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यावेळी तिला तिच्या मुलावर आणि कुटुंबावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे होते.
-
रुपालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, सुरुवातीला तिला अभिनयात परत येण्यास संकोच वाटत होता. कारण ती सतत तिचे कुटुंब आणि मुलगा यांचाच विचार करत होती.
-
रुपाली गांगुलीने सांगितले की, तिच्या पतीनेही तिला या शोसाठी खूप प्रेरित केले. त्यानंतर तिने ‘अनुपमा’ हा टीव्ही शो करण्याचे ठरवले.
![prateik babbar did not invite family for wedding](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/prateik-babbar-did-not-invite-family-for-wedding.jpg?w=300&h=200&crop=1)
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”