-
अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने २५ जून रोजी जाहीर केले की त्यांनी जगभरातून ४८७ नवीन सदस्यांना आमंत्रित केले आहे. अकादमीचे अध्यक्ष बिल क्रेमर आणि जेनेट यांग यांनी संयुक्त वक्तव्यात सांगितले की, “यावर्षी आम्ही नवीन सदस्यांच्या स्वागतासाठी आतुर आहोत. जगातील या दिग्गज कलाकारांनी त्यांच्या कलेतून चित्रपटक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.”
जाणून घेऊयात भरतातील कोणत्या? कलाकारांना यामध्ये सदस्यत्वासाठी आमंत्रण मिळाले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी आत्तापर्यंत १०० हून अधिक चित्रपटात काम केलेलं आहे. त्यांना अकादमी (The Academy of Motion Picture Arts and Sciences) मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शबाना या पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या राहिल्या आहेत. त्यांचे घुमर आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी हे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेत. -
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली हे त्यांच्या भव्यदिव्य आणि काल्पनिक चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या RRR या चित्रपटाने नातू नातू या गाण्यासाठी २०२३ मध्ये अकादमी (ऑस्कर) पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार जिंकला होता.
-
एसएस राजामौली आणि त्यांची पत्नी रमा राजामौली यांना अकादमीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रमा एक प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आहेत. राजामौली यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा त्यांनी मदत केली आहे.
-
रितेश सिधवानी हे एक भारतीय चित्रपट निर्माता आणि एक्सेल एंटरटेनमेंटचे सह-संस्थापक आहेत. निर्माता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘दिल चाहता है’ ला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तसेच प्रसिद्ध वेबसीरीज इनसाइड एजला ४६ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले होते. रितेशनाही अकादमीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रणही मिळाले आहे.
-
रवि वर्मन हे सिनेमॅटोग्राफर आहेत. हिंदी, मल्याळम आणि तेलगू यांसारख्या विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. अकादमीने त्यांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
-
गोलियों की रासलीला राम-लीला, बर्फी!, PS-I आणि PS-II सारख्या ब्लॉकबस्ट चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी रवी वर्मान यांनी केली आहे.
-
रिमा दास यांचा ‘व्हिलेज रॉकस्टार’ हा सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाच्या श्रेणीतील ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून पाठवण्यात आलेला चित्रपट होता. अकादमी पुरस्कारांसाठी सादर केलेला हा पहिला आसामी चित्रपट होता. रिमा यांनाही अकादमीमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
-
प्रेम रक्षित हे कोरिओग्राफर असून त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. त्याने ऑस्कर पुरस्कार जिंकलेले RRR मधील नातू नातू हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. रक्षित यांना अकादमीकडून आमंत्रण देखील मिळाले आहे. दरम्यान, भारतीय कलाकारांमध्ये ए आर रहमान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, सूर्या, विद्या बालन, आमिर खान, सलमान खान, अली फजल, आदित्य चोपड़ा, गुनीत मोंगा, रीमा कागती, एकता कपूर आणि शोभा कपूर हे अगोदरच अकादमीचे सदस्य आहेत.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच