-
नाना पाटेकर सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहेत.
-
त्यांनी नुकतीच ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या आयुष्यातील अनेक प्रसंग व आठवणी सांगितल्या.
-
नाना पाटेकर यांना त्यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांच्याबद्दल विचारण्यात आलं.
-
तुमची पत्नी तुमच्यावर ओरडली आहे का? असा प्रश्न नाना पाटेकर यांना विचारण्यात आला.
-
त्यावर नाना म्हणाले, “हो ओरडली आहे. ते होतंच राहतं. प्रत्येक पत्नी पतीला ओरडत असतेच.”
-
मग त्यांना मुलगा मल्हार ओरडतो का? असं विचारण्यात आलं.
-
“मल्हार पण एकदा माझ्यावर ओरडला होता,” असं नाना म्हणाले.
-
तुम्ही ओरडा खाण्यासारखं काय केलं होतं, असं त्यांना विचारण्यात आलं.
-
त्यावर ते म्हणाले, “काहीतरी चुकीचंच केलं असेल. नाहीतर का रागावला असता.”
-
याच मुलाखतीत नाना पाटेकर यांनी पत्नी नीलकांती यांच्याबद्दल विधान केलं.
-
“ती बँकेत अधिकारी होती. आम्हाला एका शोचे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता,” असं नाना पाटेकर म्हणाले.
-
“मी १५-२० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरीही १५०० मिळायचे,” असं नाना पाटेकर म्हणाले.
-
“तिने मला म्हटलं की तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा, माझ्या पगारातून पैसे येतात. तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो,” असं नाना पाटेकर म्हणाले.
-
“त्यावेळी माहित नव्हतं यशस्वी होऊ की नाही,” असंही नाना यांनी नमूद केलं.
-
(सर्व फोटो- नाना पाटेकर आणि मल्हार पाटेकर सोशल मीडिया)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख