-
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
-
लग्नानंतर दोघंही वर्षातून एकदा परदेशात फिरायला जात असल्याचं गेल्या काही वर्षांत पाहायला मिळालं आहे.
-
यंदा सिद्धार्थ-मिताली नेमके कुठे जाणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती.
-
“वार्षिक सहल कुठे ते सांगतो” असं कॅप्शन देत सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.
-
यानंतर सिद्धार्थ-मितालीच्या चाहत्यांनी त्यांच्या परदेशवारीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती.
-
अखेर सुंदर असे फोटो शेअर करत या मराठमोळ्या जोडप्याने ते इटली फिरायला गेले असल्याचं सांगितलं आहे.
-
सिद्धार्थ – मितालीने इटलीतून काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघांचाही वेस्टर्न अन् काहीसा हटके लूक पाहायला मिळत आहे.
-
सिद्धार्थ-मितालीच्या ‘इटली व्हेकेशन’च्या फोटोंवर त्यांचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर इन्स्टाग्राम )

मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळं बेळगावमध्ये वाहकाला मारहाण; महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद