-
टीव्हीशिवाय पंजाबी चित्रपट आणि अनेक अल्बममध्ये दिसलेल्या अभिनेत्री हिना खानबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तिने स्वतः ही बातमी सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत आणि ती बरी होण्यासाठी शक्य ते प्रयत्न करेल.” दरम्यान, तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील लोकांनी हिना खान लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. मनोरंजन क्षेत्रातील असे अनेक स्टार्स आहेत जे कॅन्सरला हरवून लोकांसाठी प्रेरणा बनले आहेत. मात्र, असेही काही आहेत ज्यांना कॅन्सरमुळे जीव गमवावा लागला आहे. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल (फोटो स्रोत: @realhinakhan/instagram)
-
सोनाली बेंद्रे
बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला २०१८ मध्ये मेटास्टॅटिक एंडोमेट्रियल कॅन्सर झाल्याचे निदान झाले. उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली होती. जवळपास ६ महिने ती तिथे राहिली. उपचारानंतर सोनाली कॅन्सरमुक्त झाली. (फोटो स्रोत: @iamsonalibendre/instagram) -
लिसा रे
२००९ मध्ये, लिसा रे यांना बोन मॅरो कॅन्सर झाल्याचे निदान झाले. यामुळे तिला नीटपणे पायावर उभेही राहता येत नव्हते. २०१० मध्ये, लिसा रे स्टेम सेल प्रत्यारोपणाच्या मदतीने कर्करोगमुक्त झाली. (फोटो स्रोत: @lisaraniray/instagram) -
मनिषा कोईराला
बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांनाही नोव्हेंबर २०१२ मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबई आणि न्यूयॉर्कमध्ये उपचार झाले. २०१३ मध्ये ती पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली. (फोटो स्रोत: @m_koirala/instagram) -
संजय दत्त
बॉलीवूड अभिनेता संजय दत्तनेही फुफ्फुसाच्या धोकादायक कर्करोगावर मात केली आहे. अभिनेत्याला २०२० मध्ये चौथ्या स्टेजचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. मात्र हार न मानता त्याने कठीण काळातही धैर्य राखले आणि रोगाचा पराभव केला. संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे प्राण गमवावे लागले आणि त्यांची पहिली पत्नी ऋचा शर्मा यांनाही मेंदूचा कर्करोग झाला होता. (फोटो स्रोत: @duttsanjay/instagram) -
मुमताज
७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांनाही कर्करोगाचे निदान झाले होते. मुमताज यांना २००२ मध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तथापि, अनेक केमो थेरेपीनंतर त्यांनी कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकली. (फोटो स्त्रोत: @mumtaztheactress/instagram) -
राकेश रोशन
बॉलीवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजेच घशाच्या कर्करोगाचा पहिल्या टप्प्याचे निदान २०१८ मध्ये झाले. मात्र त्यांनी हार न मानता उपचार घेतले. त्यांनी कर्करोगावर मात केली आणि आज ते चांगले जीवन जगत आहेत. (फोटो स्रोत: @rakesh_roshan9/instagram) -
इरफान खान
इरफान खानला २०१८ मध्ये न्यूरोएन्डोक्राइन कर्करोगाचे निदान झाले होते. हा एक असा कर्करोग आहे जो पोट, अपेंडिक्स, कोलन, रेक्टम आणि स्वादुपिंड या ठिकाणी होऊ शकतो. लंडनमध्ये एक वर्ष उपचार घेतल्यानंतर अभिनेता २०१९ मध्ये भारतात परतला. मात्र, असे असतानाही त्यांनी २०२० साली जगाचा निरोप घेतला. (फोटो स्रोत: @irrfan/instagram) -
विनोद खन्ना
बॉलीवूड अभिनेते विनोद खन्ना यांचे मूत्राशयाच्या कर्करोगाने निधन झाले. ते कर्करोगाच्या ॲडव्हान्स स्टेजने त्रस्त होते, असे सांगण्यात येते. २०१० पासून त्यांना हा कर्करोग होता. यामुळे त्यांना बराच वेळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ते कॅन्सरला हरवू हरवू शकले नाहीत.
(हे देखील वाचा: ‘Just Imagine : ‘बाहुबली’ चित्रपटात राजकीय पुढाऱ्यांनी अभिनय केला असता तर? पाहा ‘एआय’न…)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”