-
भारतीय संघाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० विश्वचषक (T-20 Worldcup) आपल्या नावावर केला आहे.
-
दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारतीय संघाने जेतेपद पटकावले आहे.
-
यादरम्यान मराठी कलाकारांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनीदाखील टीम इंडियाचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
-
रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत विराट कोहली, अक्षर पटेल,जसप्रीत बुमराह, सुर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या तसंच कर्णधार रोहित शर्माचंदेखील कौतुक केलं.
-
अभिनेते मनोज बाजपेयी यांनी “क्या जबरदस्त जीत है, लहरा दो” असं कॅप्शन दिलं, तसंच या अभूतपूर्व विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाचा खूप अभिमान आहे असंही ते म्हणाले
-
“आज वर्ल्डकप नही दिल जीत लिया हमेशा के लिए” असं कॅप्शन देत कार्तिक आर्यने पोस्ट शेअर करत भारतीय संघाचं कौतुक केलं.
-
विकी कौशल भारताची जर्सी घालून सामना पाहत होता. भारतीय संघ जिंकल्यानंतर विकीनेदेखील टीम इंडियाचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
-
अर्जुन कपूर यानेदेखील टीम इंडियाचं अभिनंदन करत सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली.
-
“भारताने किती वर्षानंतर हा वर्ल्डकप जिंकला याचा मला खूप आनंद होतोय” असं एव्हरग्रीन अभिनेत्री काजोलने पोस्ट शेअर करत लिहिलं.
-
‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षितने भारतीय संघाच कौतुक केलं आणि खास पोस्ट शेअर केली.
-
आयुष्मान खुरानाने भावनिक होऊन या सामन्याबद्दल भरभरून लिहिलं आणि टीम इंडियासाठी एक खास फोटोदेखील शेअर केला.
-
नुकताच बाबा झालेला वरुण धवन रोहित शर्मा, विराट कोहलीचं कौतुक करत टीम इंडियाच्या या विजयात सहभागी झाला.
-
“आपण ट्रॉफी घरी आणली” असं कॅप्शन देत अभिनेत्री करीना कपूर खानने भारतीय संघाचं कौतुक केलं.
-
भाईजान सलमान खानने टीम इंडियाचं कौतुक करत त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली.
-
“अभिनंदन इंडिया असं मी आधीच सांगितलं होतं ना” असं कॅप्शन देत सोनू सूद याने स्टोरी शेअर केली.
-
तमन्ना भाटियानेदेखील आपल्या भावना व्यक्त करत टीम इंडियाचं कौतुक केलं.
-
अनन्या पांडेनेदेखील आपल्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत भारतीय संघाचं कौतुक केलं.
-
अभिनेत्री सुश्मिता सेनने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत टीम इंडि याचा गर्व आहे असं म्हटलं. (All Photos- Social Media)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”