-
९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर -२’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
एकाच दिवशी हा चित्रपट मराठी व हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
-
नुकतेच या चित्रपटाचा पोस्टर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
-
‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले आनंद दिघे झोपाळ्यावर बसलेले दिसतात.
-
‘हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’ अशी ओळही नमूद करण्यात आली आहे.
-
त्यामुळे आता कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे.
-
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, अभिनेते सचिन पिळगांवकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित होते.
-
‘धर्मवीर – २’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे.
-
कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.
-
नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते.
-
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता.
-
अभिनेता प्रसाद ओकने साकारलेली दिघे साहेबांची भूमिका लाजवाब होती.
-
या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंगेश देसाई आणि प्रसाद ओक/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती