-
नुकताच ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील सर्वच स्टार्सनी लोकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा शाश्वत चॅटर्जीही चर्चेचा विषय ठरला आहे.
-
या चित्रपटात शाश्वतने मुख्य खलनायकाची भूमिका केली नसली तरी त्याचा स्क्रीन टाइम कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्यापेक्षा कमी नाही.
-
याआधी शाश्वत विद्या बालन स्टारर ‘कहानी’ या चित्रपटात सीरियल किलरच्या भूमिकेत दिसला आहे. मात्र असं असूनही तो हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरला आहे.
-
शाश्वत हा बंगाली चित्रपटसृष्टीतील अंडररेटेड स्टार आहे. शाश्वत प्रसिद्ध बंगाली अभिनेते शुभेंदू चॅटर्जी यांचा मुलगा आहे. एवढ्या मोठ्या सुपरस्टारचा मुलगा असूनही शाश्वतने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.
-
आपल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होतं की, चित्रपट मिळविण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एवढ्या मोठ्या स्टारचा मुलगा असल्याने दिग्दर्शकांनी त्याला चित्रपटात घेतलं नाही.
-
अभिनेता म्हणाला, “स्टार्सच्या मुलांना सहज काम मिळतं हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांना त्यांच कौशल्य सिद्ध करावं लागतं. प्रत्येक पावलावर माझी तुलना माझ्या बाबांशी केली जाते. त्यांचा प्रेझेन्स खूप जादुई होता, मी त्यांच्यासमोर झिरो आहे. मी बाबांसारखा दिसतही नाही.”
-
शाश्वत पुढे म्हणाला, “कालपुरुष या मालिकेतून इंडस्ट्रीत मला ओळख मिळाली. मला बाबांची खूप आठवण येते. आता ते असते तर मी जे काही साध्य केलं आहे ते त्यांना पाहता आलं असतं.”
-
शाश्वत चॅटर्जीने १९९६ मध्ये आलेल्या बंगाली चित्रपट ‘बख्शो रहस्य’मधून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो ब्योमकेश बक्षी, मोनचुरी, प्राक्तन, हेमंता या बंगाली चित्रपटांमध्ये दिसला.
-
बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त, तो ‘कहानी’, ‘जग्गा जासूस’, ‘दिल बेचारा’, ‘दोबारा’, ‘धाकड’ आणि ‘क्रू’ सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्याने ‘द नाईट मॅनेजर’ आणि ‘टूथ परी’ या वेबसीरिजमध्येही आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
(फोटो स्रोत: @@saswatachatterjeeofficial/instagram)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”