-
१९६० च्या दशकातील सुंदर व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शर्मिला टागोर यांनी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केले. दोघांची प्रेमकहाणी खूप छान होती. मन्सूर अली खान हे भारतीय क्रिकेट संघाचे सर्वांत तरुण कर्णधार होते; तर शर्मिला टागोर बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या.
-
या जोडप्याच्या लग्नाच्या करारात अनोखी अट ठेवण्यात आली होती. याचा खुलासा खुद्द शर्मिला टागोर यांनी अलीकडेच केला आहे.
-
खरं तर, अलीकडेच शर्मिला टागोर यांनी कपिल सिब्बल यांना एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी क्रिकेट आणि चित्रपटांबद्दल चर्चा केली. त्यात त्यांनी सांगितले की, त्यांना सुरुवातीपासूनच क्रिकेटची आवड होती.
-
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान यांची प्रेमकहाणी सुरू झाली तेव्हा ते दोघे केवळ इंडस्ट्रीतच नाही, तर देशभरात चर्चेत होते. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, इंडस्ट्रीत सतत बदल होत असतात. छोट्या बजेटच्या चित्रपटांची कथा चांगली असेल, तर त्यांना प्रेक्षकही मिळत आहेत.
-
पुढे शर्मिला टागोर म्हणाली की, क्रिकेटवर बोलण्यासाठी मी पुरेशी पात्र नाही. मी कधीच क्रिकेटबद्दल बोलू शकत नाही आणि हा माझ्या लग्नाच्या कराराचा भाग होता, असे त्यांनी विनोदी पद्धतीने सांगितले. पुढे अभिनेत्रीने सांगितले की, क्रिकेट विषयावर बंदी असल्याने मी काही चर्चा करू शकत नाही.
-
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांची पहिली भेट कोलकातामध्ये एका क्रिकेट पार्टीदरम्यान झाली होती. त्यावेळी शर्मिला टागोर भरपूर क्रिकेट बघायच्या. या पार्टीद्वारे दोघांची चांगली ओळख झाली होती.
-
मन्सूर अली खान यांनी जेव्हा अभिनेत्रीला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा त्यांनी एक विचित्र अट ठेवली होती. शर्मिला यांनी अशी अट घातली होती की, जर त्यांनी सलग तीन चेंडूंत तीन षटकार मारले, तर त्या लग्नासाठी हो बोलतील.
-
मन्सूर अली खान यांनी ही अट मान्य केली होती आणि दुसऱ्याच दिवशी तीन चेंडूंत तीन षटकार मारून शर्मिला टागोर यांचे मन जिंकले. त्यानंतर २७ डिसेंबर १९६९ रोजी दोघे लग्नबंधनात अडकले. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार