-
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनी चित्रपटांसाठी वजन कमी केले आहे. अलीकडेच ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने आधी वजन वाढविले आणि नंतर कमी केले. या यादीत आणखी एक अभिनेता आहे; ज्याने अवघ्या पाच महिन्यांत २६ किलो वजन कमी केले.
-
अभिनेता जयदीप अहलावत यांचा ‘महाराज’ चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटासाठी अभिनेता जयदीप अहलावतने ज्या प्रकारे परिवर्तन केले आहे, ते पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला आहे आणि चाहते या नवीन लूकचे खूप कौतुक करीत आहेत. अभिनेत्याने केवळ पाच महिन्यांत २६ किलो वजन कमी केले.
-
अभिनेत्याने खुद्द आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल सांगितले आहे. त्याने अगोदरचे काही फोटो शेअर केले आहेत; ज्यात तो लठ्ठ दिसत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याच्या फिट अवतारात दिसत आहे.
-
आपला फोटो पोस्ट करीत अभिनेत्याने सांगितले की, ‘महाराज’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याने प्रथम आपले वजन १०९.७ किलोपर्यंत वाढवले. त्यानंतर केवळ पाच महिन्यांत त्याने ८३ किलोपर्यंत वजन कमी केले.
-
अभिनेत्याने याचे श्रेय त्याने ट्रेनर प्रज्वल शेट्टीला दिले आहे. प्रज्वल शेट्टी हा एक प्रोफेशनल ट्रान्सफॉर्मेशन कोच आहे; जो बॉबी देओलचाही ट्रेनर आहे.
-
आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने ‘महाराज’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
![Rahul Gandhi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Rahul-Gandhi-10.jpg?w=300&h=200&crop=1)
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”