-
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘ओम शांती ओम’ २००७ मध्ये रिलीज झालेला चित्रपट सुपरहिट ठरला होता. प्रेक्षकांना केवळ हा चित्रपटच नाही तर त्यातील गाणीही आवडली. त्याची गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत आणि खूप ऐकली जातात.
-
या चित्रपटाने ५५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये अनेक पुरस्कार जिंकले. चित्रपटाच्या अनेक दृश्ये आणि गाण्यांमध्ये अनेक भारतीय चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी छोट्ट्या भूमिका साकारल्या.
-
या चित्रपटात ‘दिवानगी’ नावाचे एक गाणे आहे, या गाण्यात फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टार्स दिसले होते. हे गाणे स्वतःच एक आयकॉनिक गाणे बनले.
-
सलमान खान, सैफ अली खान, संजय दत्त, विद्या बालन, तब्बू, रेखा, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, सुष्मिता सेन, शबाना आझमी, प्रियांका चोप्रा, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांच्यासह अनेक बड्या स्टार्सनी गाण्यात परफॉर्म केलेले आहे.
-
अलीकडेच एका मुलाखतीत तब्बूने हा चित्रपट रिलीज होऊन तब्बल १७ वर्षांनी याबाबत एक नवीन गोष्ट शेअर केली. अभिनेत्रीने सांगितले की तिचे बरेच चाहते तिला शाहरुख खानसोबत पाहण्यासाठी आतुर होते. नेमकी त्याचवेळी तिला या गाण्यासाठी संधीही मिळाली.
-
चित्रपटाच्या दिग्दर्शिका फराह खानसाठी तिने या गाण्यात सहभाग घेतला असल्याचेही तब्बूने सांगितले. फराहने तब्बूसाठी उत्तम कपडे, अप्रतिम हेअर स्टाइल आणि मेकअपची व्यवस्था केली होती. यासोबतच शाहरुख खानने या गाण्यात काम करणाऱ्या सर्व स्टार्सना महागडे गिफ्ट दिल्याचेही तब्बूने सांगितले.
-
तब्बूचा यावर्षी आलेला ‘क्रू’ हा चित्रपट होता. ज्यात टी शेवटची दिसली होती. या चित्रपटात करीना कपूर आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत होत्या. तब्बू लवकरच अजय देवगणसोबत ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ५ जुलै रोजी रिलीजसाठी सज्ज आहे.
(Photos- Stills From Film)
(हे पण वाचा: PHOTOS : भारतातील ‘या’ राज्याला राजधानीच नाही; १० वर्षांपासून दुसऱ्या राज्याच्या राजध…)
![prateik babbar did not invite family for wedding](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/prateik-babbar-did-not-invite-family-for-wedding.jpg?w=300&h=200&crop=1)
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”