-
शनिवारी २९ जून रोजी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका असा टी-२० वर्ल्डकपचा सामना रंगला होता.
-
या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी अविस्मरणीय विजय मिळविला आणि दुसऱ्यांदा हा विश्वचषक आपल्या नावावर केला.
-
यानिमित्ताने अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावर या सामन्याचे फोटो शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम टप्पू म्हणजेच राज अनादकटने भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
राजने १२ वर्षांपूर्वीचा रोहित शर्माबरोबरचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
-
“हा फोटो १२ वर्षांपूर्वी काढला होता जेव्हा मला रोहित शर्माबरोबर एका जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती. एक लहान मुलगा आणि क्रिकेटचा चाहता म्हणून मी त्याला भेटायला खूप उत्सुक होतो. त्यावेळेस माझ्या आईने माझ्यासाठी नवीन कॅमेरा विकत घेतला होता जेणेकरून मी त्याच्याबरोबर फोटो काढू शकेन.” असं कॅप्शन राजने या फोटोला दिलं आहे.
-
राजने या विजयासाठी हिटमॅन आणि सर्व भारतीय क्रिकेट खेळाडूंचे खूप आभार मानले आणि सर्वांचे अभिनंदनदेखील केलं आहे.
-
राज आणि रोहित शर्माचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (All Photos- Raj Anadkat)

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!